शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019: मानमोडे जनतेसाठी धावणारे : अ‍ॅड. श्रीहरी अणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:07 IST

आतापर्यंत दक्षिणमध्ये घेणारे अनेक उमेदवार झाले, आता मात्र प्रमोद मानमोडे हे जनतेसाठी धावणारे उमेदवार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केले.

ठळक मुद्देसभा, जनसंपर्क अभियान, बाईक रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आतापर्यंत दक्षिणमध्ये घेणारे अनेक उमेदवार झाले, आता मात्र प्रमोद मानमोडे हे जनतेसाठी धावणारे उमेदवार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केले.नरसाळा रोडवरील टेलिफोन चौक आणि अयोध्यानगर चौकात आयोजित दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमोद मानमोडे, माजी महापौर पांडुरंग हिवरकर, अनिल वाघमारे, विनायक गवडी, सत्यंजय त्रिवेदी, किशोर दिकोंडवार, विठ्ठलराव गावंडे, हेमंत मानकर, इसाक मन्सूरी, जागीरभाई, मंजूर अन्सारी, गोरखनाथ सोलके, अब्दुल करीम खान, जाकीर खान, अमोल वनवे, गणेश नाखले, अरुणा वेरुळकर, जरीना खान, ईश्वर भिसे, सूर्यवंशी, राकाँचे प्रवक्ते डॉ. मूर्जी, स्नेहल शिंदे, डबले, विकास नारायणे उपस्थित होते.अ‍ॅड. श्रीहरी अणे विदर्भ राज्य आघाडीचे समर्थन देताना म्हणाले, सरकारला जनसामान्यांच्या समस्यांशी काहीही घेणे-देणे नाही. सत्तेत आलो तर विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र ते पाळले नाही. आलेल्या पैशांचा उपयोग जनसामान्यांसाठी झाला नाही. सर्व पातळ्यांवर सरकार अपयशी ठरले आहे.मानमोडे यांच्या प्रचारार्थ शिवनगर, सुदामपुरी, नेहरूनगर, ईश्वरनगर, गुरुदेवनगर, मिरे ले-आऊट, बापूनगर, कबीरनगर, भांडेप्लॉट चौक, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार, उदयनगर, जम्बुदीपनगर, साईमंदिर, शारदा चौक, अयोध्यानगर, लाडीकर ले-आऊट, बँक कॉलनी, शारदा चौक, जवाहरनगर, सोमवारी क्वॉर्टर, प्रभूजीनगर, बिडीपेठ भागात बाईक रॅली काढून मतदारांशी संपर्क साधला. मानमोडे यांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

 

 

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-south-acनागपूर दक्षिणShrihri Anneश्रीहरी अणे