शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : आर्थिक मंदी भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे : मनीष तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 23:53 IST

आज देशावर जे आर्थिक संकट कोसळले आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. मनीष तिवारी यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधुनिक भारत घडविण्यात व्यावसायिकांचा मोठा सहभाग आहे. व्यावसायिकांनी आपली ताकद ओळखावी. आज देशावर जे आर्थिक संकट कोसळले आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. मनीष तिवारी यांनी केला.ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘इंडियन इकॉनॉमी-करंट सिनॅरियो-मिथ्स अ‍ॅण्ड रिअ‍ॅलिटीज' या कार्यक्रमात ते बुधवारी नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख उपस्थित होते. तिवारी म्हणाले, ही परिस्थिती बदलणे आता तुमच्या हातात आहे. उद्योगांमध्ये गुंतवणूक नाही त्यामुळे रोजगार निर्मिती नाही. चुुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केला. आर्थिक मंदी हे याचेच कारण आहे. सरकार व्यापारीविरोधी आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला गळती लागली. सरकारला आर्थिक दिवाळखोरीची कल्पना आल्याने त्यांनी रिझर्व्ह बँकेकडून पैसा घेतला. समाजात वैमनस्य निर्माण करण्याचे काम भाजपने केले. जनतेला उद्याची भीती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने आपला आवाज बुलंद करणे आवश्यक आहे. सत्तेच्या विरोधात आमच्या आवाजात आवाज मिसळून सत्तापरिवर्तन करा. डॉ. आशिष देशमुख यांच्या रूपाने आपल्या क्षेत्राचा आर्थिक विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले.डॉ. आशिष देशमुख म्हणाले, जनतेने संधी दिल्यास नागपूरचा आर्थिक विकास करू. या क्षेत्राचा कायापालट करू. भारतात आर्थिक मंदी आहे. मागील पाच वर्षात एकही उद्योग आणला नाही. आता पुन्हा एक कोटी रोजगाराचे गाजर जनतेला दाखविले जात आहे, त्यामुळे सावध राहा, असे आवाहन त्यांंनी केले. यावेळी काँग्रेसचे आशिष दुवा, विशाल मुत्तेमवार, ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम