शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशहिताशी तडजोड केली : योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 23:42 IST

आपल्या देशात विकासाची गंगा अगोदरच वाहिली असती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बेईमानी व भ्रष्टाचाराच्या चौकटीतच अडकले होते. त्यांनी नेहमी देशहिताशी तडजोड केली, या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.

ठळक मुद्देविरोधकांसाठी राजकारण हे स्वार्थाचे साधन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपल्या देशात विकासाची गंगा अगोदरच वाहिली असती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बेईमानी व भ्रष्टाचाराच्या चौकटीतच अडकले होते. त्यांनी नेहमी देशहिताशी तडजोड केली, या शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.

सक्करदरा तिरंगा चौकात आयोजित या सभेला भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, शिवसेना नेते शेखर सावरबांधे प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेस व राष्ट्रवादी अनेक वर्षे सत्तेत होते. त्यांच्या मनात आले असते तर गरिबांसाठी कल्याणकारी योजना, पायाभूत सुविधांचा विकास, दहशतवादावर वचक इत्यादी बाबी ते करू शकले असते. मात्र त्यांच्याकडे ते ‘व्हिजन’च नव्हते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष घराणेशाहीच्या जाळ्यात अडकले आहेत. काँग्रेसकडे तर नेता नाही व नीतीही नाही. त्यांचे धोरण देशाप्रती चांगले नाही. राजकारण हे परमार्थ व लोकांच्या मदतीसाठी झाले पाहिजे. परंतु ज्यांच्यासाठी राजकारण हे स्वार्थाचे साधन आहे, त्यांच्याकडून देशहिताची कल्पनाच करू शकत नाही, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. अगोदरचे सरकार काही विशिष्ट लोकांसमोर गुडघे टेकायची. आता मात्र सरकार फतवे नाही तर संविधानावर चालताना दिसून येत आहे. या सरकारमध्ये समर्पणाचा भाव आहे, असेदेखील ते म्हणाले.मोदींनी बाबासाहेबांचे स्वप्न साकार केलेदेशात कलम ३७० लागू झाले तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला विरोध केला होता. १९५२ मध्ये त्यांनी काश्मीर या कलमामुळे विकासापासून वंचित राहील व फुटीरवादी शक्ती वाढतील, असा इशारा दिला होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने एका झटक्यात हे कलम रद्द केले व बाबासाहेबांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. नागपूर ही संघभूमी व दीक्षाभूमी आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाची ही भूमी असून आता विकासाच्या दिशेने शहराची वेगाने वाटचाल सुरू आहे, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019yogi adityanathयोगी आदित्यनाथnagpur-south-acनागपूर दक्षिण