शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, पण ज्येष्ठ नेत्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 20:47 IST

गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांनी उमेदवारी अर्ज भरला. शक्तिप्रदर्शनही केले. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा गटबाजीचे संकेत देऊन गेली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकिकडे भाजपामध्ये उफाळलेली बंडखोरी शमविण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू आहे. पण वारंवार गटबाजीचा फटका बसलेल्या काँग्रेस पक्षामध्ये अजूनही गटबाजी कायम आहे. गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांनी उमेदवारी अर्ज भरला. शक्तिप्रदर्शनही केले. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा गटबाजीचे संकेत देऊन गेली.काँग्रेसने शहरातील सहा विधानसभेपैकी पाच विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या नावाची घोषणा बुधवारी केली. बुधवारी रात्री उशिरा मध्य आणि पूर्व विधानसभेचे उमेदवार घोषित केले. मात्र पश्चिम, उत्तर व दक्षिणचे उमेदवार मंगळवारीच घोषित झाले होते. विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांनी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी आमंत्रित केले. नितीन राऊत आणि बंटी शेळके यांनी ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांना आमंत्रित केले आहे. गुरुवारी विकास ठाकरे आणि गिरीश पांडव यांच्या रॅलीत माजी खासदार विलास मुत्तेमवार उपस्थित होते. पण माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद उपस्थित नव्हते. बंटी शेळके यांनी रॅलीमध्ये दाखल होऊन, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. परंतु ज्या नेत्यांची सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा होती, पुन्हा एकदा काँग्रेसच्या एकजुटीचा संदेश शहरभर पोहचवायचा होता, ते ज्येष्ठ नेते या रॅलीत दिसले नाही. या रॅलीमध्ये अनंतराव घारड, बबनराव तायवाडे सहभागी झाले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसnagpur-west-acनागपूर पश्चिमnagpur-south-acनागपूर दक्षिण