शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Maharashtra Assembly Election 2019 : दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी स्वयंसेवकांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 10:08 PM

नागपूर जिल्ह्यात १२ हजार ८७ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हेल्प लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये विशेषत्वाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसह व वृध्द मतदारांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे, हे विशेष.

ठळक मुद्देब्रेन लिपीत व्होटर स्लीप : जिल्ह्यात १२,०७८ दिव्यांग मतदार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग, अपंग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा व विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १२ हजार ८७ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हेल्प लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये विशेषत्वाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसह व वृध्द मतदारांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे, हे विशेष.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एखादी व्यक्ती जर अंध किंवा एखाद्या तीव्र शारीरिक व्याधींनी ग्रस्त असेल आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील चिन्ह ओळखण्यास सक्षम नसेल, अशा परिस्थितीत मतदान अधिकाऱ्याच्या परवानगीने सहायक मदत करु शकतो. नागपूर जिल्ह्यात सध्या १२ हजार ८७ दिव्यांग व्यक्तींची नोंद मतदार यादीमध्ये करण्यात आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या संकेतस्थळाद्वारे आणि ऑनलाईन अ‍ॅपद्वारे नोंदणी झाली आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदान केंद्रात जाण्यासाठी रॅम्प, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.अशा व्यक्तींना रांगेत प्रतीक्षेत न राहता मतदान करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. यासोबतच मतदान केंदावर कायमस्वरुपी किंवा संपूर्ण सुविधा, ब्रेल लिपितील मतदार स्लिप, डमी मतदान पत्र (बॅलेट पेपर), मॅग्नीफाईंग ग्लास, मॅग्नीफाईंग शिट इत्यादी साहित्य, दर्शक संकेत चिन्ह, मार्गदर्शन व साहाय्य करण्यासाठी विशेष शिक्षक, अपंग शाळेतील कर्मचारी, शासकीय वाहनाने दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सुविधाही उपलब्ध राहणार आहे.पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आदी उपस्थित होते.महिनाभरात आठ हजारावर मतदार वाढलेनिवडणूक विभागाने राबवलेल्या विशेष नोंदणी अभियानात महिन्याभरातच नागपुरात ८०५६ इतक्या नवीन मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे नागपूरची मतदार संख्या आता ४१,७१,४२० इतकी झाली आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.यापूर्वी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात नागपूरची एकूण मतदार संख्या ४१,६३,३६७ इतकी होती. यात आणखी ८ हजार मतदारांची भर पडली अहे. नागपूर पश्चिममध्ये १४५५ तर कामठीमध्ये १४५८ इतकी सर्वाधिक नवीन नोंदणी करण्यात आली. यानंतर नागपूर पूर्व १०११, नागपूर उत्तर ९३१, हिंगणा ७१२, नागपूर दक्षिण-पश्चिम ७०७, नागपूर दक्षिण ५९१, काटोल ३७५, उमरेड २५४, रामटेक २१०, नागपूर मध्य २०१, आणि सावनेर १४८ नवीन मतदार वाढले आहेत. विशेष म्हणजे तृतीयपंथी मतदारांची संख्या एक ने कमी झाली आहे. पूर्वी १०० तृतीयपंथी मतदार होते ते आता ९९ राहिले आहेत.एकूण मतदार : ४१,७१,४२०पुरुष मतदार : २१,३४,९३२महिला मतदार : २०,३६,३८९तृतीयपंथी : ९९एकूण मतदान केंद्र : ४४१२एकूण मतदार संघ : १२एकूण उमेदवार - १४६

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019collectorजिल्हाधिकारीMediaमाध्यमे