शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

Maharashtra Assembly Election 2019: युती सरकारने नागपूरच्या तोंडाला पाने पुसली : आशिष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 23:06 IST

नागपूरच्या विकासासाठी सरकारने कोणतेही योगदान दिले नाही. या सरकारने नागपूरकरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी आज केली.

ठळक मुद्देनरेंद्रनगरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या विकासासाठी सरकारने कोणतेही योगदान दिले नाही. या सरकारने नागपूरकरांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका काँग्रेस आघाडीचे दक्षिण-पश्चिम नागपूरचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी आज केली.शनिवारी सकाळी नरेंद्रनगर येथे डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर काढण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क साधला. यावेळी राकेश पन्नासे, सनद यादव, सागर लोखंडे माहुरे, आशिष बालपांडे, गौतम गाणार व इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.मिहान, सेझ, एमआयडीसी, मोठ्या कंपन्या, उद्योगामध्ये मोठ्या गुंतवणुकीसाठी मोठा रोजगार अशा आश्वासनाची खैरात वाटून २०१४ मध्ये भाजपने सत्ता बळकावली. खोट्या आश्वासनामुळेच नागपूरच्या अधोगतीला सुरुवात भाजपने विकासापेक्षा जुमलेबाजी जास्त केली. सबका साथ सबका विकास म्हणत सगळ्यांच्या तोंडचे घास हिरावून घेतले. बेरोजगारी महागाई, महिला असुरक्षितता अशा अनेक प्रश्नांनी नागपूरकर हैराण आहेत. बेरोजगारी ही प्रत्येक घरातील गंभीर समस्या आहे. इच्छा नसताना वृद्ध आईवडिलांना एकटे सोडून नोकरीसाठी नागपूरबाहेर गेलेल्या युवक-युवतींची संख्या जास्त आहे.नागपूर व विदर्भाला आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा मिहान प्रकल्प मागे पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना रोजगारासाठी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न विचारून ते म्हणाले, उद्योगधंदे नाहीत म्हणून रोजगार नाही. नोकरीअभावी युवकांचे लग्नाचे वय निघून जात आहे. त्यांच्यात नैराश्य पसरले आहे. अजून काय काय धिंडवडे काढायचे आहेत भाजपला नागपूरकरांचे, असा सवाल त्यांनी केला.नागपूरकरांनी आता परिवर्तन करावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. सतेचा गैरवापर करणाऱ्या, सामान्यांवर महागाईचे ओझे टाकणाऱ्या, सामान्य मतदारांना गृहित धरून व त्यांना भावनिक आवाहन करून त्यांची मते लाटून स्वत:ची पोळी शेकणाऱ्यांना ओळखा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम