शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रोचे दीक्षित यांना मानाचा ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ इयर’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 22:19 IST

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. फाऊंडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च स्टडीज ट्रेनिंग (फर्स्ट) कन्स्ट्रक्शन कौन्सिल, या बांधकाम व्यवसायाला मदत करणाऱ्या संस्थेतर्फे पुरस्कार दिला जाणार आहे.

ठळक मुद्दे२५ किमीचे काम ५० महिन्यात पूर्ण : जगात महामेट्रोच्या कार्याची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांची मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इयर २०२०’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. फाऊंडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च स्टडीज ट्रेनिंग (फर्स्ट) कन्स्ट्रक्शन कौन्सिल, या बांधकाम व्यवसायाला मदत करणाऱ्या संस्थेतर्फे पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कार समारंभ आभासी पद्धतीने १६ आॅक्टोबरला सायंकाळी ५ वाजता होणार आहे.सात सदस्य असलेल्या ज्युरीने दीक्षित यांची या पुरस्काराकरिता निवड केली आहे. ज्युरी सदस्यांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या एशिया पॅसिफिक बांधकाम विभागाचे प्रमुख बेंजामिन ब्रिन, एचडीएफसी कॅपिटल अ‍ॅडव्हायसर्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल रुंगटा, आयडीएफसी प्रोजेक्ट्सचे माजी उपाध्यक्ष प्रदीप सिंह, एक्विरस कॅपिटलचेकार्यकारी संचालक विजय अग्रवाल, ऑलकार्गो लॉजिस्टिक्स पार्क प्रा.लि.चे मुख्य संचालन अधिकारी आर. के. नारायण, आयएफएडब्ल्यूपीसीए, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद अली जाना आणि अपोलो टायर्सचे विभागीय प्रमुख फरीद अहमद यांचा समावेश होता.महामेट्रोच्यानागपूर आणि पुणे प्रकल्पाचे टीम लीडर म्हणून त्यांनी आजवर संपादित केलेल्या यशाकरिता दीक्षित यांना हा पुरस्कार दिला जात आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या एकूण ४ पैकी २ मार्गांवर प्रवासी सेवा सुरू झाली आहे. या दोन मार्गांचे अंतर २५ किमी असून ५० महिन्यांत काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण देशात या गतीने पहिल्यांदाच काम पूर्ण झाले आहे. मेट्रोने केवळ ३० महिन्यात ट्रायल रन घेतले. लॉकडाऊनच्या काळात चार स्टेशनचे काम पूर्ण केले. दीक्षित आणि महामेट्रोला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पर्यावरण संरक्षणाचे निकष पाळल्यामुळे महामेट्रोच्या स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलतर्फे प्लॅटिनम दर्जा मिळालाआहे. महामेट्रोच्या कामाच्या गतीची आणि गुणवत्तेची नोंद सर्वांनी घेतली आहे. तेलंगणा सरकारने वारंगल येथे मेट्रो प्रकल्प सुरू करण्याकरिता महामेट्रोची मदत मागितली आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर