नेतेगिरी की चमकोगिरी ?

By Admin | Updated: June 28, 2015 03:00 IST2015-06-28T03:00:49+5:302015-06-28T03:00:49+5:30

हा फोटो जरा निरखून पाहा. यात एक व्यक्ती पांढऱ्याशुभ्र बंगाली पायजमात आपल्याला डावीकडे दिसत आहे.

The magnificence of leaderagiri? | नेतेगिरी की चमकोगिरी ?

नेतेगिरी की चमकोगिरी ?

हा फोटो जरा निरखून पाहा. यात एक व्यक्ती पांढऱ्याशुभ्र बंगाली पायजमात आपल्याला डावीकडे दिसत आहे. या व्यक्तीचे नाव आहे इब्राहिम खान. ते भाजपचे पदाधिकारी आहेत. फोटोत आणखी थोडे पुढे पाहा. तेच इब्राहिम खान दोन मुलांना वीटभट्टीच्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात बसवून त्यांचे बोट पकडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अ‍ॅक्शन फोटो काढून घेत आहेत. वास्तविक हे दोन्ही फोटो इब्राहिम खान यांनी संगणकावर एकत्र करून प्रेसनोटसोबत प्रसिद्धीसाठी पाठविले आहे. त्यांचा दावा आहे की, २५ जून रोजी त्यांनी दोन मुलांना खड्ड्यात बुडताना वाचविले होते. त्यांचा दावा खरा असेल तर त्यांचे कौतुक करायला हवे. मात्र, या लहान मुलांना पुन्हा पाण्यात बसवून त्यांच्यासोबत स्वत:चा अ‍ॅक्शन फोटो काढून घेत असतील तर नेतेगिरीची ही चमकोगिरी निश्चितच लाजिरवाणी आहे.

Web Title: The magnificence of leaderagiri?