एमएडीसीने दिली मेट्रो रेल्वेला जागा

By Admin | Updated: February 12, 2015 02:16 IST2015-02-12T02:16:54+5:302015-02-12T02:16:54+5:30

जलद परिवहनासाठी नागपुरात लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी आवश्यक जागेचे सर्वेक्षण जोरात सुरू आहे.

MADC gave space to Metro Rail | एमएडीसीने दिली मेट्रो रेल्वेला जागा

एमएडीसीने दिली मेट्रो रेल्वेला जागा

नागपूर : जलद परिवहनासाठी नागपुरात लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी आवश्यक जागेचे सर्वेक्षण जोरात सुरू आहे. खापरी मेट्रो डेपोसाठी आवश्यक ३७.४ हेक्टर जागेच्या हस्तांतरणाची कागदपत्रे बुधवारी मिहानच्या अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्याकडे सुपूर्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी चिचभुवन परिसरात संरेखनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या ठिकाणी मेट्रो मार्गासाठी २० मीटर रुंद जागा मोकळी करण्यात येत आहे. एकूण ३८.२१५ कि़मी. लांबीच्या मार्गांपैकी मेट्रो रेल्वे ३३.६१५ कि़मी. मार्गावर वरून (एलिव्हेटेड), तर ४.५ कि़मी. अंतरापर्यंत जमीन पातळीवर असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MADC gave space to Metro Rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.