मशीन पार्ट व लाेखंडी साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:12 IST2021-09-15T04:12:24+5:302021-09-15T04:12:24+5:30

कळमेश्वर : अज्ञात चाेरट्याने कंपनीतील मशीनचे स्पेअर पार्ट व अंदाजे तीन टन लाेखंडी साहित्य असा एकूण ६० हजार रुपये ...

Machine parts and lacquer material lamps | मशीन पार्ट व लाेखंडी साहित्य लंपास

मशीन पार्ट व लाेखंडी साहित्य लंपास

कळमेश्वर : अज्ञात चाेरट्याने कंपनीतील मशीनचे स्पेअर पार्ट व अंदाजे तीन टन लाेखंडी साहित्य असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी सातनवरी येथील व्यंकटेश काेरूगेशन नामक कंपनीत साेमवारी (दि. १३) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

रमेश अखिलचंद्र टावरी (५०, रा. धनलक्ष्मी निवास, माेदी नं. १, सीताबर्डी, नागपूर) यांच्या मालकीचे खैरी सातनवरी येथे व्यंकटेश काेरूगेशन नावाने कंपनी असून, २०१६ पासून ही कंपनी बंद आहे. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने कंपनीमधील मशीनचे स्पेअर पार्ट व लाेखंडी साहित्य असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. याप्रकरणी टावरी यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ५४५, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक बुंदे करीत आहेत.

Web Title: Machine parts and lacquer material lamps