माँ दधिमती प्रकट महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:23+5:302021-02-24T04:09:23+5:30

नागपूर : माँ दधिमती भक्त परिवारच्या वतीने श्री माँ दधिमती प्रकट महोत्सव जुनी ओळी कामठी येथे साजरा करण्यात आला. ...

Maa Dadhimati Prakat Mahotsav | माँ दधिमती प्रकट महोत्सव

माँ दधिमती प्रकट महोत्सव

नागपूर : माँ दधिमती भक्त परिवारच्या वतीने श्री माँ दधिमती प्रकट महोत्सव जुनी ओळी कामठी येथे साजरा करण्यात आला. यावेळी महेश तिवारी, सुनील शर्मा, अशोक भाभड़ा, अतुल बहड़, नरेंद्र बहड़, सुरेश बहड़, गोविंद जोपट, संजय भाभड़ा, अक्षय भाभड़ा, अजय भाभड़ा, धनंजय भाभड़ा, महेंद्र बहड़, दीपक जोपट, गजेंद्र भाभड़ा, राकेश जोपट, रामकिशोर शर्मा, ओमप्रकाश करेशिया, सजल तिवारी, मंगला शर्मा, रेनू जोपट, तारा जोपट, श्री जोपट, पूजा जोपट, कविता भाभड़ा, मीना भाभड़ा उपस्थित होते.

सदाबहार गीतांनी रसिक मंत्रमुग्ध ()

नागपूर : व्ही ५ एन्टरटेन्मेंटच्या वतीने सोमवारी ऑनलाईन कार्यक्रमात सदाबहार गीतांचे आयोजन झाले. यावेळी योगेश आसरे, रितेश कुलसंगे, मनोज बांगडकर, शोएब खान, इरफान खान, संजीवनी बूटी, रूही सूर्यवंशी, प्रशांत वलिवकर, अनिल पिल्ले, अदिती सिरसावन, नितीन झाडे यांनी गाणी सादर केली. संचालन अमोल शेंडे यांनी केले. संगीत संयोजन मंगेश पटले, नंदू गोहणे यांचे होते.

स्वर मल्हारने सादर केली गाणी ()

नागपूर : स्वर मल्हार ग्रुपच्या वतीने ऑनलाईन गीतांचे सादरीकरण झाले. संकल्पना प्रशांत ठाकूर व प्रशांत वलिवकर यांची होती. संचालन स्वप्ना पांडे यांनी केले. अनामिका दिंडी, हेमांगी धर्माधिकारी, सुमित्रा ठाकरे, अक्षय कुळकर्णी, नुतन भेलकर, अरविंद राजे, अर्चना ठाकरे यांनी गाणी सादर केली.

मारवाडी महिला संमेलनद्वारे रक्तदान ()

नागपूर : अखिल मारवाडी महिला संमेलनच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष शकुंतला अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. यावेळी ४८ युनिट रक्तदान जमा करण्यात आले. दिव्यांग अनाथ आश्रमांतील मुलांना खाद्य सामुग्री भेट देण्यात आली. यावेळी रजनी अग्रवाल, पौर्णिमा गोयल, सुषमा अग्रवाल, शितल अग्रवाल, आशा सारडा, शोभा लोहिया, अनिता डालमिया, निर्मला गोयंका उपस्थित होते.

आश ते डू मर्दानी आखाडातर्फे शिबिर ()

नागपूर : आश-ते-डू मर्दानी आखाडा असोसिएशनच्या वतीने तीन दिवसीय नि:शुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन झाले. शिबिरात मुलांना हस्तकला, पदकला आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. नागपूर शहर सचिव किरण यादव यांनी मुलांना प्रशिक्षण दिले. यावेळी नगरसेवक मनोज चाफले, पुरुषोत्तम वैद्य, संजय वानखेडे, संभाजी भोसले, संदेश खरे, विनोद डहारे, नरेंद्र बिहार, निळकंठ कुकडे, कीर्ती कुमरे, काजल राऊत, आंचल राऊत उपस्थित होते.

दयानंत आर्य कन्या विद्यालयातर्फे मातृभाषा दिन ()

नागपूर : आर्य विद्या सभेद्वारा संचालि दयानंद आर्य कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी सिमरन ज्ञानचंदानी व हर्षा मानवटकर यांनी मातृभाषेबद्दल मार्गदर्शन केले. संचालन संगीता ज्ञानचंदानी यांनी केले तर आभार भारती कालरा यांनी मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक कृपलानी, दीपा लालवानी, वेदप्रकाश आर्य उपस्थित होते.

Web Title: Maa Dadhimati Prakat Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.