लक्झरी वाहन चोरांची टोळी पोलिसांच्या हाती : फॉर्च्युनर, एसयुव्हीसह चार वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:14 PM2019-09-18T23:14:14+5:302019-09-18T23:15:34+5:30

कार आणि लक्झरी वाहनांची चोरी करणारी आंतराज्यीय टोळी गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी या टोळीतील दोन सदस्यांना अटक केली. त्यांच्याजवळून फॉर्च्युनर एसयुव्हीसह चार वाहने जप्त केली आहेत.

Luxury vehicle thief gangs arrested: Four vehicles seized with Fortuner, SUV | लक्झरी वाहन चोरांची टोळी पोलिसांच्या हाती : फॉर्च्युनर, एसयुव्हीसह चार वाहने जप्त

लक्झरी वाहन चोरांची टोळी पोलिसांच्या हाती : फॉर्च्युनर, एसयुव्हीसह चार वाहने जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कार आणि लक्झरी वाहनांची चोरी करणारी आंतराज्यीय टोळी गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी या टोळीतील दोन सदस्यांना अटक केली. इमरान खान इस्माईल खान (३८) रा. सुफियाननगर, अमरावती आणि विनोद शंकरराव गिऱ्हे (४०) मूर्तिजापूर, अकोला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांच्याजवळून फॉर्च्युनर एसयुव्हीसह चार वाहने जप्त केली आहेत.
या टोळीचे मुख्य सूत्रधार उदय मारुती पाटील रा. कोल्हापूर आणि घाटकोपर मुंबई येथील जैनुद्दीन शाह तथा जलालुद्दीन शाह हे आहेत. ही टोळी अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. उदय पाटीलविरुद्ध मुंबई, पुणे आणि ठाणे येथे वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तेथे पोलिसांच्या नजरेत आल्याने उदयने विदर्भाकडे लक्ष वेधले. त्याच्या टोळीने नागपूर, अमरावती आणि इर शहरांमध्ये आपले जाळे पसरविले. त्याच्या टोळीत शहरातील गुन्हेगारही जुळलेले आहेत.
ही टोळी स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने वाहन चोरी करते. वाहन चोरण्याचे काम इमरान करतो. कार चोरून तो अमरावतीला फरार होतो. उदयने सांगितलेल्या लोकांकडे तो चोरलेले वाहन सोपवतो. अमरावती येथून चोरी केलेली वाहने सोलापूर, कोल्हापूर आदी शहरांद्वारे मुंबई येथे जैनुद्दीन आणि जलालुद्दीनजवळ पोहोचतात. दोघेही आॅटो डीलर व कबाडी व्यवसायी आहेत. ते वाहनाचे इंजिन आणि चेसीस नंबर बदलवायचे. बोगस दस्तावेजाच्या मदतीने आरटीओतून वाहन नोंदणीकृतसुद्धा करून देत होते. बोगस दस्तावेज बनवण्याचे काम सोलापूर येथील अतिकउर्रहमान हा करतो. यानंतर ग्राहकांना वाहनांची विक्री केली जाते. ही टोळी लक्झरी वाहनांचीच चोरी करते. यामुळे वाहने लवकरच विकल्या सुद्धा जातात.
अलीकडेच शहरातून चार चाकी वाहनांच्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पोलिसांना तपासात या टोळीचा हात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून इमरान व विनोदला पकडले. त्यांनी इतर साथीदारांचीही माहिती दिली. त्यांच्याजवळून ४६ लाख रुपये किमतीची फॉर्च्युनरसह चार वाहने जप्त करण्यात आली. गेल्या सहा महिन्यात शहरातून १२ चार चाकी वाहने चोरीला गेली होती.
ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने, एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बी.एस. खंडाळे, पीएसआय चौरसिया, कर्मचारी रवींद्र गावंडे, नरेंद्र ठाकूर, प्रवीण रोडे, सागर ठाकरे, कुणाल मसराम, सुहास शिंगणे, सुरज भोंगाडे, आशिष पाटील यांनी केली.

Web Title: Luxury vehicle thief gangs arrested: Four vehicles seized with Fortuner, SUV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.