आमिष दाखवून महिलांचे दागिणे हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:26 IST2020-12-11T04:26:37+5:302020-12-11T04:26:37+5:30
उघड्या घरातून लाखाचे दागिने केले लंपास नागपूर : दरवाजा उघडा ठेवून दूध आणायला गेलेल्या व्यक्तीच्या घरातून एक लाखाचे दागिने ...

आमिष दाखवून महिलांचे दागिणे हडपले
उघड्या घरातून लाखाचे दागिने केले लंपास
नागपूर : दरवाजा उघडा ठेवून दूध आणायला गेलेल्या व्यक्तीच्या घरातून एक लाखाचे दागिने लंपास केले. वंजारीनगर, अजनी येथील रहिवासी संदेश आनंद शुक्ला हे बुधवारी सकाळी ६.३० च्या सुमारास दूध आणायला घराबाहेर पडले. यादरम्यान दरवाज्यातून प्रवेश करीत अज्ञात आराेपींनी घरातील एक लाखांचे दागिने तसेच १८ हजार रुपये लंपास केले. अजनी पाेलिसांनी चाेरीचे प्रकरण दाखल केले आहे.
प्लॉटची विक्री करून फसवणूक
नागपूर : विकलेला भूखंड गहाण ठवून फसवणूक करणाऱ्या बापलेकाच्या विराेधात हिंगणा पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृष्ण गंगाराम अवचट (६९) आणि विनाेद कृष्ण अवचट (४०) असे आराेपी पितापुत्राचे नाव आहे. ते नांदाखुर्द, हिंगणा येथील रहिवासी आहेत. आराेपींनी सारंग केळापुरे यांच्याकडून प्लाॅटची विक्री करून १४.५० लाख रुपये घेतले हाेते. यानंतर हाच प्लाॅट शुभम सहकारी नागरी पतसंस्थेत गहाण ठेवला.