शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

जगात सर्वाधिक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 10:53 PM

जगात सर्वाधिक मृत्यू हे कर्करोगाने व त्यातही फुफ्फुसाच्या कर्करोगाने होत आहे. कर्करोग रुग्णांची वाढती संख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा चिंता व्यक्त केली आहे, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सुब्रजित दासगुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देसुब्रजित दासगुप्ता यांची माहिती : आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पूर्वी सर्वाधिक मृत्यू हे विविध आजारांच्या साथीने व्हायचे. मात्र, गेल्या पाच-सात वर्षात हे प्रमाण बदलले आहे. जगात सर्वाधिक मृत्यू हे कर्करोगाने व त्यातही फुफ्फुसाच्या कर्करोगाने होत आहे. कर्करोग रुग्णांची वाढती संख्या पाहता जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा चिंता व्यक्त केली आहे, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सुब्रजित दासगुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.‘ग्लोबोकॉनच्या-२०१८’च्या अहवालानुसार, जगभरात २.१८ मध्ये १८.१ दशलक्ष नव्या कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ९.६ दशलक्ष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कर्करोगात सर्वाधिक प्रमाण म्हणजे ११.६ टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आहे. या रोगाच्या मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक, १८.४ टक्के आहे. त्याखालोखाल स्तन, हेड-अ‍ॅण्ड नेक, ओव्हरी, आतड्या, यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे, असेही डॉ. दासगुप्ता म्हणाले.पौगंडावस्थेतील मुलांमध्ये वाढतोय कर्करोग४० टक्के कर्करोग हा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतो. हे प्रमाण अलीकडे ३० टक्केपर्यंत आले आहे. मात्र तरी मागील ७ वर्षांत पौगंडावस्थेतील मुलांमध्ये (१५ ते १७ वर्षे) कर्करोग होण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्रात २०१८ मध्ये ५१५६ नवीन रुग्णांची नोंद झाली. तपासणीअंती ३२६० रुग्णांना कर्करोग असल्याचे निदान झाले आहे.विशेष कृती दलाची स्थापनाकर्करोगाचे वाढते प्रमाण गंभीरतेने घेत केंद्र शासनाने विशेष कृती दल स्थापन केले आहे. २०२०-२०३० यादरम्यान कृती आराखडाही तयार केला आहे. त्याअंतर्गत कर्करोग रुग्णालयांना मजबूत केले जात आहे. आवश्यक त्या सोयी, उपकरणे उपलब्ध करून दिली जात आहे. त्याअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्राला केंद्र सरकारने ४५ कोटी तर महाराष्ट्र शासनाने १० कोटी रुपये अनुदान दिले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्र आधी प्रादेशिक होते. आता टर्शरी सेंटर असा दर्जा वाढवून दिला आहे.

टॅग्स :cancerकर्करोगDeathमृत्यू