A Lunatic killed his father in Nagpur | नागपुरात  मनोरुग्णाने केला वडिलांचा खून

नागपुरात  मनोरुग्णाने केला वडिलांचा खून

लोकमत न्यूज नेटवक

नागपूर : एमआयडीसीतील अमरनगर येथे एका मनोरुग्ण मुलाने आपल्या वडिलांचाच खून केला. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता घडली. सिकंदर रंगारी असे आरोपीचे नाव आहे तर सम्राट रंगारी (५२) असे मृत वडिलांचे नाव आहे. दोघेही अमरनगर येथील पालकर ले-आऊट येथे राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार सिकंदर हा मनोरुग्ण आहे. परिसरातील नागरिकांनाही याची माहिती आहे. रात्री ९ वाजता सिकंदर व वडील सम्राट दोघेही घरीच होते. सिकंदरने दरवाजा बंद केला आणि तो वडिलांशी वाद घालू लागला. दरम्यान त्याने चाकूने वडिलांवर हल्ला केला. सम्राटचा आवाज एकूण शेजारी गोळा झाले. सिकंदरला पकडणे धोक्याचे असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना सूचना दिली. डीसीपी नुरुल हसन आणि एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सिकंदरला पकडले. तो सुद्धा रक्ताने माखला होता. पोलिसांनी सम्राटला रुग्णालयात पोहोचवले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलीस सिकंदरला वडिलांचा खून का केला याबाबत विचारपूस करीत होते.

Web Title: A Lunatic killed his father in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.