‘लोकमत संस्काराचे मोती’च्या विजेत्यांचा ‘लकी ड्रॉ’

By Admin | Updated: December 10, 2015 03:09 IST2015-12-10T03:09:09+5:302015-12-10T03:09:09+5:30

‘लोकमत संस्काराचे मोती’ या स्पर्धेतून वर्ग दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देण्यात आली होती.

'Lucky Draw' by the winners of 'Lokmat Sanskar Ki Moti' | ‘लोकमत संस्काराचे मोती’च्या विजेत्यांचा ‘लकी ड्रॉ’

‘लोकमत संस्काराचे मोती’च्या विजेत्यांचा ‘लकी ड्रॉ’

‘लोकमत संस्काराचे मोती’ या स्पर्धेतून वर्ग दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देण्यात आली होती. या स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुधवारी सायंकाळी लोकमत भवनात या स्पर्धेचा ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. यात ‘हवाई सफर’, ‘लॅपटॉप’, ‘सायकल’, ‘स्मार्टफोन’ व टॅब’ जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ‘लकी ड्रॉ’ काढताना न्यू अ‍ॅपोस्टॉलिक इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कुकडे ले-आऊटच्या प्राचार्य विनीता बावर, सह्याद्री कॉन्व्हेंट, पिपळा येथील संचालक नरेश भोयर, साईनाथ हायस्कूल भगवाननगरचे संस्थापक सचिव ज्ञानेश्वर पोहाणे, रेल्वे मेन्स हायस्कूलचे सुपरवायझर दीपक हम्पीहोळी आणि रेल्वे मेन्स हायस्कूलचे प्राचार्य पद्माकर तेलंग उपस्थित होते.

Web Title: 'Lucky Draw' by the winners of 'Lokmat Sanskar Ki Moti'