शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

नशिबाने प्रकाश हिरावला, त्याच्या मेहनतीने प्रकाशवाट गवसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 22:48 IST

एखाद्या बिकट परिस्थितीत सामान्यजनही नशिबाकडे बोट दाखवून हतबल होतात. पण काही जणांचा आत्मविश्वास इतका प्रबळ असतो, की ते नशिबाने दिलेल्या संकटावरही मात करतात. जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये दिव्यांग प्रवर्गात प्रथम आलेला वेदांत बोरकुटे हा त्यातीलच एक. ध्येयपूर्तीची जिद्द, प्रचंड आत्मविश्वास आणि मेहनतीवर विश्वास त्याच्या व्यक्तिमत्त्वातील या त्रिसूत्रीने त्याने भविष्याची प्रकाशवाट गाठली. त्याचे यश हे कौतुकास्पदच.

ठळक मुद्देनागपूरचा वेदांत जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये दिव्यांगात प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखाद्या बिकट परिस्थितीत सामान्यजनही नशिबाकडे बोट दाखवून हतबल होतात. पण काही जणांचा आत्मविश्वास इतका प्रबळ असतो, की ते नशिबाने दिलेल्या संकटावरही मात करतात. जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये दिव्यांग प्रवर्गात प्रथम आलेला वेदांत बोरकुटे हा त्यातीलच एक. ध्येयपूर्तीची जिद्द, प्रचंड आत्मविश्वास आणि मेहनतीवर विश्वास त्याच्या व्यक्तिमत्त्वातील या त्रिसूत्रीने त्याने भविष्याची प्रकाशवाट गाठली. त्याचे यश हे कौतुकास्पदच.दीपक बोरकुटे व अपर्णा बोरकुटे यांचा वेदांत हा एकुलता एक मुलगा. जन्मताच त्याच्या एका डोळ्याची ज्योती हरविली आहे. आईवडिलांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण यश आले नाही. पण आईवडिलांनी त्याच्या दिव्यांगत्वाचा बाऊ केला नाही. त्याला प्रोत्साहन दिले. त्याचा आत्मविश्वास वाढविला आणि यशस्वीरीत्या त्याला पायावर उभे राहण्याचे बळ दिले. आईवडिलांच्या आधाराने त्याच्या पंखांना बळ मिळाले आणि यशाला गवसणी घालण्यासाठी प्रचंड जिद्द निर्माण झाली. वेदांतने दहावीच्या परीक्षेत सामान्य विद्यार्थ्यांच्या तोडीचे ९८.२ टक्के गुण मिळविले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांने जेईई अ‍ॅडव्हान्सची तयारी सुरू केली. बारावीच्या परीक्षेसोबतच तो जेईईची तयारी करीत होता. अभ्यासापासून त्याने स्वत:ला दूर केले नाही. आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्याने अभ्यासाचे नियोजन आखले. त्यावर वाटचाल सुरू केली. अशात बारावीचा निकाल हाती आला. वेदांतला ९१.८५ टक्के गुण मिळाले. खरी प्रतिक्षा त्याला जेईई अ‍ॅडव्हान्सची होती. तो निकाल शुक्रवारी लागला. त्याने दिव्यांग वर्गांमध्ये ऑल इंडियामध्ये प्रथम येण्याचा मान पटकाविला. देशातील टॉपच्या आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे त्याचे स्वप्न या निकालाने पूर्ण झाले आहे. यापुढची त्याची वाटचाल आयआयटी पवई आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना वेदांत म्हणाला की, आईवडिलांची मिळालेली साथ, आयआयटी होमकडून मिळालेले मार्गदर्शन, यामुळे यशाला गवसणी घालणे सोपे गेले.लक्ष्य गाठण्यासाठी त्याग महत्त्वाचा असतो२०१७ पासून वेदांत जेईई अ‍ॅडव्हान्सची तयारी करीत आहे. सामान्यपणे या वयात मुले भरपूर अ‍ॅक्टिव्ह असतात. पण वेदांतने स्मार्ट फोनला हात लावला नाही. त्याचे फेसबुक अकाऊंट नाही. व्हाटअ‍ॅप तो कधी वापरत नाही. सोशल मीडियापासून तो दूर असतो. या सर्व गोष्टी त्याला आवडत नाही. टीव्ही सुद्धा बघितला नाही. वाचनाची आवड आणि बुद्धिबळात थोडासा तो रमतो. आजच्या तरुणाईला ज्या सोशल मीडियाने भुरळ पाडली, त्या सोशल मीडियाशी संबंधही न ठेवणारा वेदांत म्हणतो, लक्ष्य गाठण्यासाठी काहीतरी त्याग करावा लागतो.मुलावर प्रचंड विश्वास आहेवेदांतमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. आम्ही फक्त त्याचे सारथी होतो. त्याने आपले लक्ष्य गाठण्यासाठी घेतलेली मेहनत खूप महत्त्वाची आहे. आम्हाला त्याच्यावर विश्वास होता. त्याने जिद्दीने तो पूर्ण केला आहे. देवाने त्याची एक बाजू बंद केली असली, तरी दुसरी बाजू त्याने आपल्या प्रयत्नाने उघडली आहे, अशी भावना आई अपर्णा व वडील दीपक बोरकुटे यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Result Dayपरिणाम दिवसStudentविद्यार्थी