दहावीतील विद्यार्थ्यांसाठी एलटीएसई स्कॉलरशीप परीक्षा रविवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST2021-02-05T04:50:22+5:302021-02-05T04:50:22+5:30

नागपूर : सध्या दहावीत शिकणारे आणि डॉक्टर व इंजिनिअर बनण्याचे ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय व नामांकित वैद्यकीय आणि अभियांत्रिकी ...

LTSE Scholarship Examination for 10th standard students on Sunday | दहावीतील विद्यार्थ्यांसाठी एलटीएसई स्कॉलरशीप परीक्षा रविवारी

दहावीतील विद्यार्थ्यांसाठी एलटीएसई स्कॉलरशीप परीक्षा रविवारी

नागपूर : सध्या दहावीत शिकणारे आणि डॉक्टर व इंजिनिअर बनण्याचे ध्येय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय व नामांकित वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाकरिता घेण्यात येणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी सखोल मार्गदर्शन करणारे ललित काळबांडे यांच्या ललित ट्युटोरियल्समध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२३ करिता अकरावी, बारावी, नीट (वैद्यकीय) व जेईई (अभियांत्रिकी), पूर्वपरीक्षा कॅप्सुल बॅच (दोन वर्षीय ऑफ लाईन व ऑनलाईन) कोचिंगकरिता याहीवर्षी विद्यार्थ्यांना क्लासेसतर्फे १०० टक्क्यांपर्यंत एलटीएसई स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे.

परीक्षा रविवार, ३१ जानेवारीला दुपारी २ ते ३ या वेळेत ऑनलाईन घेण्यात येणार आहे. निकाल रविवारी सायंकाळी ७ वाजता जाहीर होईल. परीक्षेसाठी आपले नाव डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट ललितट्युटोरियल्स डॉट काम या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. एन्ट्रन्स एक्झाम प्ले स्टोअरवरून एलटीएसई अ‍ॅप डाऊनलोड करून त्याद्वारे देता येईल. इयत्ता दहावीचे गणित व विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नप्रणालीवर राहील.

काळबांडे यांच्या कॅप्सुल बॅचचे वैशिष्ट म्हणजे ऑफलाईनप्रमाणेच ऑनलाईन बॅचही लाईव्ह राहणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न तसेच शंकांच्या निरसनासाठी वेगळा वेळ देण्यात येणार असून ऑनलाईन टेस्ट, रिझल्ट तसेच नियमित पालकांची ऑनलाईन सभासुद्धा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षेला वेळ मिळण्याच्या दृष्टिकोनातून व २०२३ मध्ये होणाऱ्या मेडिकल व अभियांत्रिकी पूर्व परीक्षेची कसून तयारी करून घेण्याच्या दृष्टीने १४ जून २०२१ रोजी ही कॅप्सुल बॅच सुरू होणार आहे. काळबांडे यांच्यासह राष्ट्रीय स्तरावर या परीक्षेसाठी शिकविण्याचा १५ ते २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल. एलटीएसई स्कॉलरशीप एन्ट्रन्स टेस्टद्वारे विदर्भ-मराठवाडा व खान्देशातून शेकडो विद्यार्थी दरवर्षी १०० टक्क्यांपर्यंत स्कॉलरशीपचा फायदा घेऊन आपले स्वप्न साकारतात.

ट्युटोरियल्सने २०२० च्या नीट परीक्षेत १९० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशास पात्र केले आहे. शंतनू दाळूने ६६० गुण मिळविले तर ४० विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. तीन विद्यार्थ्यांनी बॉयोलॉजी विषयात ३६० पैकी ३५० गुण मिळविले. तसेच अभियांत्रिकी कॉलेजला १३६ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. (वा.प्र.)

Web Title: LTSE Scholarship Examination for 10th standard students on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.