रविवारी आठवड्यातील सर्वात कमी रुग्णवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:56+5:302020-12-02T04:07:56+5:30

नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी गेल्या आठवड्याभरातील सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात २८७ रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, ...

The lowest outbreak of the week on Sunday | रविवारी आठवड्यातील सर्वात कमी रुग्णवाढ

रविवारी आठवड्यातील सर्वात कमी रुग्णवाढ

नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी गेल्या आठवड्याभरातील सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात २८७ रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, दोन आठवड्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली. आज ३६३ रुग्ण बरे झाले. ९ रुग्णांचा मृत्यूने मृतांची एकूण संख्या ३६५४ झाली असून बाधितांची संख्या १११४७७ वर पोहचली.

दिवाळीपूर्वी २५० वर खाली गेलेली रुग्णसंख्या दिवाळीनंतर वाढताना दिसून येत आहे. मात्र, या रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या फार कमी आहे. नागपूर जिल्ह्यात मृत्यू होत असलेल्या रुग्णामंध्ये जिल्हाबाहेरील व उशिरा उपचाराला येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. मागील आठवड्यात एका दिवसातील चाचण्यांची संख्या ९ हजारावर गेली असताना मात्र मागील दोन दिवसांपासून ५ हजारावर चाचण्या झालेल्या नाहीत. यामुळेही कमी रुग्णांची नोंद झाली असावी असे बोलले जात आहे. या आठवड्यात २३ तारखेला ३५७, २४ तारखेला ३५६, २५ तारखेला ३१९, २६ तारखेला ४५२ व २७ तारखेला सर्वाधिक ४५७, २८ तारखेला ४०१ नव्या रुग्णांची भर पडली. दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २४४, ग्रामीणमधील ३९ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीणमधील १ तर जिल्हाबाहेर ४ आहेत.

-बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण स्थिर

मागील संपूर्ण आठवड्यात रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९२ टक्क्यांवर स्थिर होते. आतापर्यंत १०२८७२ रुग्ण बरे झाले आहेत. ४९७८ रुग्ण सक्रिय असून यातील ३६४३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर १३३५ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहे. एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआरच्या ४२०० तर रॅपीडी अँटीजेनच्या ९६१ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. अँटीजेन चाचण्यातून १५ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

::कोरोनाची आजची स्थिती

-दैनिक संशयित : ५१६१

-बाधित रुग्ण : १११४७७

_-बरे झालेले : १०२८७२

- उपचार घेत असलेले रुग्ण : ४९७८

- मृत्यू : ३६५४

Web Title: The lowest outbreak of the week on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.