नागपुरातील पॉझिटिव्हिटी दर कमी, निर्बंध तत्काळ उठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST2021-07-28T04:07:47+5:302021-07-28T04:07:47+5:30
नागपूर : जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आला असून निर्बंध तत्काळ उठविण्यात यावेत या मागणीने जोर धरला आहे. व्यापाऱ्यांसोबतच आता राजकीय ...

नागपुरातील पॉझिटिव्हिटी दर कमी, निर्बंध तत्काळ उठवा
नागपूर : जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आला असून निर्बंध तत्काळ उठविण्यात यावेत या मागणीने जोर धरला आहे. व्यापाऱ्यांसोबतच आता राजकीय नेतेदेखील यासाठी पुढे सरसावले असून विविध आयुधांच्या माध्यमातून सरकारपर्यंत आवाज पोहोचविण्यात येत आहे.
२४ एप्रिल रोजी तर पॉझिटिव्हिटीचा दर ३१ टक्क्यांच्या वर गेला होता. मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यात १५ हून कमी रुग्णांची नोंद होत असून आता पॉझिटिव्हिटीचा दर ०.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे. असे असतानादेखील राज्य सरकारने नागपूर जिल्ह्याला लेव्हल-१ ऐवजी लेव्हल-३ मध्ये ठेवले असून त्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाचा कणा मोडतो आहे. निर्बंध हटविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनीदेखील हल्लाबोल आंदोलन सुरू केले असून सोमवारी पदयात्रा व मंगळवारी बाईक रॅली काढण्यात आली. नागपुरात बाधित कमी असताना निर्बंध ठेवणे हा व्यापाऱ्यांवर अन्यायच आहे, असे मत सरकारला जागवा, व्यापार वाचवा संघर्ष समितीचे संयोजक दीपेन अग्रवाल यांनी व्यक्त केले.