नागपूर : दक्षिण नागपूरातील प्रभाग २९ व ३४ मधील न्यू म्हाळगीनगर, धनगवळीनगर, महालक्ष्मीनगर, प्रेरणानगर, विनायकनगर, शिवाजी सोसायटी, गजानननगर, प्रोसेस सोसायटी, मेहेरबाबानगर, शामनगर, सिद्धेश्वरीनगर भागात अत्यंत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे हनुमाननगर झोनमध्ये मटका फोड आंदोलन करण्यात आले. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा व नळाद्वारे जलप्रवाह कमी झाल्यास टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महिला जिल्हाप्रमुख मनिषा पापडकर, जिल्हाप्रमुख निलेश तिघरे, धीरज फंदी, सलमान खान, राजू रेवतकर, राहुल पांडे, रामभाऊ गर्गे, रुपेश ठाकरे, विनोद चकोर, निरंजन नाकाडे, किरण शेळके, रूपाली लाखे, वर्षा येरजवार, नेहा डोंमडे, मनिषा नागमोते, सोनाली उमरे, शितल टिकले, रंजना राऊत, उज्वला शंभरकर आदी सहभागी झाले होते.