शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रेयसीच्या साक्षगंधात प्रियकराचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:44 IST

प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या आणाभाका घेऊन दोन वर्षे सोबत असलेल्या तरुणीने दुसरीकडेच लग्न जुळविल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या साक्षगंधात गोंधळ घातला. प्रेयसीसह तिच्या नातेवाईकांना मारहाण केली. पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेले जेवण फेकले आणि प्रेयसीच्या भावी प्रियकराला जीवे मारण्याची धमकी दिली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देजेवण फेकले, कार्यक्रम उधळलाप्रेयसीसह तिच्या भावी पतीलाही धमकीचौघांविरुद्ध जरीपटक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या आणाभाका घेऊन दोन वर्षे सोबत असलेल्या तरुणीने दुसरीकडेच लग्न जुळविल्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या साक्षगंधात गोंधळ घातला. प्रेयसीसह तिच्या नातेवाईकांना मारहाण केली. पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेले जेवण फेकले आणि प्रेयसीच्या भावी प्रियकराला जीवे मारण्याची धमकी दिली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पुनित एकनाथ राऊत (वय ३०, रा. चॅटर्जी लेआउट, जरीपटका) याच्यासोबत २७ वर्षीय तरुणीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यांच्या प्रेमसंबंधाला पुनितच्या आईवडीलाचा होकार होता. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांकडून नकार होता. मात्र, काही झाले तरी मी दुस-यासोबत लग्न करणार नाही, असे तिने पुनितला सांगितले होते. त्यामुळे तो निश्चिंत होता. रविवारी रात्री अचानक तिच्या सांक्षगंधाचा कार्यक्रम सुरू असल्याचे पुनितला कळले. वस्तीतच घर असल्याने आरोपी पुनित तेथे धडकला. तू माझ्यासोबत प्रेम करते आणि लग्न दुस-यासोबत कसे जुळविले, असा प्रश्न करून त्याने तिचा हात पकडला. या प्रकारामुळे साक्षगंधांच्या कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. तरुणीच्या भावाने पुनितला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याला आणि अन्य नातेवाईकांना मारहाण केली. यावेळी आरोपी सुजित, राकेश हे दोन भाऊ आणि वडील एकनाथ शिवराम राऊत यांनीही तेथे पोहचून आरडाओरड सुरू केला.तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी तरुणी तसेच तिच्या आईला शिविगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर पुनितने तरुणीचा हात पकडून तिच्या भावी पतीजवळ नेले. तू हिच्याशी लग्न केले तर तुलाही ठार मारेन, अशी धमकी दिली. आरोपींनी कार्यक्रमातील साहित्याची फेकाफेक केली तसेच पाहुण्यांसाठी बनविलेले जेवणही फेकून दिले. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे संपूर्ण मोहल्लाच तेथे गोळा झाला. माहिती कळताच जरीपटका पोलीस पोहचले. दरम्यान,आज दुपारी तरुणी तेथे पोहचली. तिच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी पुनित व त्याच्या उपरोक्त नातेवाईक आरोपींविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. या घटनेची सोशल मिडियावरही या प्रकरणाची सोमवारी दिवसभर चर्चा होती.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर