घाटेअळी नियंत्रण प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:09 IST2021-01-22T04:09:07+5:302021-01-22T04:09:07+5:30
सावनेर : हरभऱ्यावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी सावनेर पंचायत समिती सभागृहात एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले. त्यात उमेद गटातील ...

घाटेअळी नियंत्रण प्रशिक्षण शिबिर
सावनेर : हरभऱ्यावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी सावनेर पंचायत समिती सभागृहात एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले. त्यात उमेद गटातील महिलांना ‘एचएएनपीव्ही’बाबत माहिती देत ते तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
‘एचएएनपीव्ही’ हे विषाणू प्रतिबंधक औषध असून, त्याची निर्मिती शेतकऱ्यांना त्यांच्या घरीच साध्या व साेप्या पद्धतीने करता येते. हे औषध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व त्याची पद्धती याबाबत प्रशिक्षणार्थींना विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात सहायक खंडविकास अधिकारी दीपक गरूड, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) चंद्रशेखर वानखेडे, प्रीती गाडे, दिनेश खोबे, कविता काटेखाये, उमेद प्रकल्प समन्वयक रोशन लकडकर यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण शिबिराचे आयाेजन जिल्हाधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रभाग समन्वयक, कृषिसखी, पशुसखी, बॅंकसखी सहभागी झाल्या हाेत्या.