शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक आज : २४ तीर्थंकरांची निघेल भव्य अहिंसा यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:42 IST

भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवार १७ एप्रिल रोजी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जैन सेवा मंडळातर्फे पर्यावरण रक्षण व प्रदूषणमुक्तीवर जनजागृती करण्यासाठी २४ तीर्थंकरांची भव्य अहिंसा यात्रा काढण्यात येईल. महावीर यूथ क्लबतर्फे आयोजित ही शोभायात्रा परवारपुरा जैन मंदिर, इतवारी शहीद चौक येथून सकाळी ७.३० वाजता निघेल. विविध मार्गांवरून जात शोभायात्रा सकाळी ९.३० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पोहोचेल. तेथे भगवान महावीर जन्मकल्याणक तसेच अभिषेक, पूजन क्रिया होईल.

ठळक मुद्देपर्यावरण रक्षण व प्रदूषणमुक्तीवर जनजागृती करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भगवान महावीर स्वामी यांचा २,६१८ वा जन्मकल्याणक महोत्सव बुधवार १७ एप्रिल रोजी उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जैन सेवा मंडळातर्फे पर्यावरण रक्षण व प्रदूषणमुक्तीवर जनजागृती करण्यासाठी २४ तीर्थंकरांची भव्य अहिंसा यात्रा काढण्यात येईल. महावीर यूथ क्लबतर्फे आयोजित ही शोभायात्रा परवारपुरा जैन मंदिर, इतवारी शहीद चौक येथून सकाळी ७.३० वाजता निघेल. विविध मार्गांवरून जात शोभायात्रा सकाळी ९.३० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पोहोचेल. तेथे भगवान महावीर जन्मकल्याणक तसेच अभिषेक, पूजन क्रिया होईल.अहिंसा रथयात्रा महावीर यूथ क्लबचे केंद्रीय अध्यक्ष दिनेश सावलकर आणि केंद्रीय सचिव प्रशांत मानेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात येईल. यात्रा संयोजक बाहुबली पळसापुरे, विशाल चाणेकर, सोनू सिंघई, संजय टक्कामोरे, श्रीकांत तुपकर, गौरव अवथनकार, नितीन रोहणे हेदेखील उपस्थित राहतील. जागोजागी पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात येईल.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील तर मुख्य अतिथी म्हणून माजी खासदार अजय संचेती हे उपस्थित राहतील. सुश्रावक गुरुभक्त ध्वजारोहण करतील. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. गिरीश व्यास, माजी खासदार नाना पटोले, आ. सुधाकर कोहळे, सुमत लल्ला जैन, अर्चना विनय कुमार जैन, हस्तीमल कटारिया, दिलीप शांतिलाल जैन, सुभाष चंद जैन, प्रकाशचंद जैन, पुनित पोद्दार, इंदरचंद पाटणी, दिलीप रांका, सुनील रायसोनी हे उपस्थित राहतील. मंगलाचरण परवारपुरा महिला मंडळातर्फे करण्यात येईल. ध्वजगीत श्री सैतवाल जैन सामाजिक मंच महिला मंडळातर्फे सादरकरण्यात येईल.शोभायात्रेचा मार्गश्री दिगंबर जैन परवार मंदिर,शहीद चौक, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल, कल्याणेश्वर मंदिर, झेंडा चौक , सुरेश भट सभागृहअहिंसा पुरस्कार वितरण सोहळा आजश्री जैन सेवा मंडळातर्फे भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त अहिंसा पुरस्कारांचे वितरण बुधवारी सायंकाळी ७ वाजता करण्यात येईल. कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय जैन सेवा मंडळाच्या सदस्याला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल. यानंतर सुनील आगरकर व चमू भजनाचे सादरीकरण करेल.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८nagpurनागपूर