बजाजनगरात लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:30+5:302021-06-16T04:10:30+5:30

आरोपी गजाआड नागपूर : पायी निघालेल्या तरुणाला मारहाण करून दोन भामट्यांनी त्याच्या खिशातील ५ हजार रुपये हिसकावून नेले. १२ ...

Looting in Bajajnagar | बजाजनगरात लुटमार

बजाजनगरात लुटमार

आरोपी गजाआड

नागपूर : पायी निघालेल्या तरुणाला मारहाण करून दोन भामट्यांनी त्याच्या खिशातील ५ हजार रुपये हिसकावून नेले. १२ जूनच्या सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. आशीष देवराव हिवरकर (वय २४) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. तो १२ जूनला सायंकाळी ५ च्या सुमारास अजनी बसथांब्याकडून चाैकातून छत्रपती चौकाकडे जात होता. पल्सर दुचाकीवर आलेल्या आरोपी अंकित बालसुंटसिंग राजपूत (वय २८, रा. ममता सोसायटी, खामला) आणि समीर ईनकारसिंग उईके (वय २९, रा. पांडे ले-आऊट, खामला) या दोघांनी त्याला मारहाण करून त्याच्याजवळचे ५ हजार रुपये हिसकावून नेले. आशीषने तक्रार नोंदवल्यानंतर बजाजनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून दोन्ही भामट्यांच्या मुसक्या बांधल्या. ते व्यसनाधीन असून सराईत गुन्हेगार आहेत.

---

Web Title: Looting in Bajajnagar