आयडियाच्या कार्यालयात लुटमार
By Admin | Updated: October 11, 2014 02:53 IST2014-10-11T02:53:12+5:302014-10-11T02:53:12+5:30
आयडिया कंपनीच्या कार्यालयात गुरुवारी रात्री लुटमारीची घटना घडली. सशस्त्र लुटारूंनी रोख आणि मोबाईलसह १ लाख, १५ हजारांचा ऐवज लुटून नेला.

आयडियाच्या कार्यालयात लुटमार
नागपूर : आयडिया कंपनीच्या कार्यालयात गुरुवारी रात्री लुटमारीची घटना घडली. सशस्त्र लुटारूंनी रोख आणि मोबाईलसह १ लाख, १५ हजारांचा ऐवज लुटून नेला. कोतवालीतील बापू महाजन, मुन्शी गल्लीत गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. चेतन शंकरराव पाटील (वय ३६, रा. बेलदार नगर, हुडकेश्वर) हे आयडिया कंपनीचे वितरक (डिस्ट्रीब्युटर) आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुन्शी गल्लीत एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावर कंपनीचे कार्यालय आहे. चेतन आणि त्यांचे सहकारी राजेंद्र वंजारी तसेच विकास लुटे यांच्यासह दिवसभराच्या व्यवहाराचा हिशेब करीत होते. रात्री ७ च्या सुमारास चाकू हातात घेऊन तीन आरोपी कार्यालयात आले. त्यांनी राजेंद्र आणि विकासच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. एकाने चेतनला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील २५ हजार रुपये, मोबाईल हिसकावून घेतले.
पळून जाताना आरोपींनी कार्यालयासमोर ठेवलेली अॅक्टीव्हा एमएच ३१/ ८४३८) दुचाकीही पळवून नेली. घटनास्थळ संवेदनशील परिसरात आहे. त्यामुळे लुटमारीच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.(प्रतिनिधी)