शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आज उजळे बघा धरती, बुद्ध-भीमाच्या प्रकाशाने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:00 IST

‘आज उजळे बघा धरती, बुद्ध-भीमाच्या प्रकाशाने...’ या कवी वामनदादा कर्डकांच्या शब्दातील संगीतमय रूपातून ‘निळ्या पाखरांच्या’ भावना व्यक्त झाल्या.

ठळक मुद्दे‘निळ्या पाखरां’च्या भावनांची रात्र : खासदार सांस्कृतिक महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘बंदगीच माझी सलामीची होती, जिंदगीच माझी गुलामीची होती, तोडलीस माझी गुलामीची बेडी, अशी भीमराया तुझी साथ होती...’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडावे. अनेक साहित्यिक, कवी, गायक व असंख्य कलावंतांनी आपापल्यापरीने ते मांडण्याचा प्रयत्न केला. हिंदी चित्रपट संगीतातील एक तारा असलेल्या रामलक्ष्मण यांच्या संयोजनातून सादर ‘एक रात्र निळ्या पाखरांची’ या कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा संगीतमय प्रवास नागपूरकरांनी अनुभवला. ‘आज उजळे बघा धरती, बुद्ध-भीमाच्या प्रकाशाने...’ या कवी वामनदादा कर्डकांच्या शब्दातील संगीतमय रूपातून ‘निळ्या पाखरांच्या’ भावना व्यक्त झाल्या.हिंदी चित्रपट संगीताचा स्वर्णिम काळ ओसरत असताना नागपूरच्या रामलक्ष्मण यांनी मधूर संगीतातून रसिकांवर पुन्हा गारुड केले. त्याच रामलक्ष्मण यांनी काही वर्षांपूर्वी नागपुरात ‘एक रात्र निळ्या पाखरांची’ हा कार्यक्रम सादर केला होता. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार ‘खासदार सांस्कृतिक महोत्सवा’त मंगळवारी त्या कार्यक्रमाच्या स्मृतींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. रामलक्ष्मण वयाने थकले असताना त्यांचा मुलगा अमर रामलक्ष्मण यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. नागपूरचे संगीत गुरू सूरमणी पं. प्रभाकर धाकडे यांची साथ त्यांनाही लाभली. कार्यक्रमात विविध गीतातून डॉ. आंबेडकरांच्या महान कार्याला संगीतमय उजाळा देण्याचा प्रयत्न कलावंतांनी केला. भलेही तुम्ही संस्कृतीचे गोडवे गा, पण जातीपातीच्या चिखलात पडलेल्या भारताची अवस्था राजा ढालेंच्या शब्दात ‘येथे वसे न समता, येथे न बंधूभाव, रे उच्चनीचतेचा येथे समूळ ठाव...’ अशी होती. राजा ढाले यांची रचना असलेले ‘उजळून टाक बुद्धा दाही दिशा मनाच्या, बदलून टाक सारख्या वाटा युगायुगाच्या...’ हे गीत हेमलता पोपटकर यांनी सादर केले. बाबासाहेबांच्या अनुयायांना ‘निळे पाखर’ही संबोधले जाते. प्रसिद्ध गायक एम. ए. कादर व त्यांच्या पत्नी झीनत कादर यांनी ‘डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांची, एक रात्र निळ्या पाखरांची...’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर गायक शशिकांत व स्वाती यांनी ‘भीमायण गातो आम्ही आता...’ सादर करून ‘मुक्तिदूत अन् शांती उपासक, मानवतेचा प्रबुद्ध नायक’ असलेल्याबाबासाहेबांच्या भीमायणाला सुरुवात केली. पं. धाकडे गुरुजी यांचे संगीत असलेल्या ‘हे बुद्धा हे बुद्धा चित्ताने परी शुद्धा...’ हे गाणे गायिका अहिंसा तिरपुडे यांनी सादर केले.अस्पृश्यतेच्या विपन्नावस्थेत पिचलेल्या समाजाचा काळोख भीमाच्या जन्माने संपल्याचे वर्णन गायिका मोहिनी बरडे यांनी ‘काळोख संपला संपून गेली रात्र, उठ मानवा जागा हो निमिषात...’ या गीतातून केले. प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे यांनी ‘उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला विविधांगी पैलू होते, बाबांचे समग्र जीवन देशास समर्पित होते...’ सादर केले. निरंजन याने यानंतर युवा गायिका आकांक्षासोबत ‘प्रबुद्ध भारत का एक सपना बाबाने देखा था...’ सादर केले. गायिका छाया वानखेडे यांनी ‘माझ्या भीमाच्या नावाचे कुंकू लाविले रमाने...’ हे गाणे सादर करून श्रोत्यांना उत्साहित केले. गायक अनिल खोब्रागडे यांनी ‘भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे...’ सादर करून उपस्थितांना भावविभोर केले. यानंतरही कलावंतांनी कार्यक्रमासाठी आलेल्या रसिकांना प्रत्येक सादरीकरणाने मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री व अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, आ. अनिल सोले, आ. मिलिंद माने, आ. नाना शामकुळे, गिरीश गांधी, धर्मपाल मेश्राम, संदीप गवई, संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचा गडकरींच्या हस्ते सत्कारकार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. जुल्फी शेख, राजेश बुरबुरे, मंगलदीप बँड पार्टीचे लहानू इंगळे, संगीतकार भूपेश सवाई, तबलावादक संदेश पोपटकर, कवी हृदय चक्रधर, नाटककार प्रभाकर दुपारे, गायक अनिल खोंब्रागडे, अभिनेता अशोक गवळी, मंजुषा सावरकर, डॉ. गणेश चव्हाण, विनायक तुमाराम, चंद्रकांत वानखडे, नरेश साखरे, राजा करवाडे आदींचा समावेश होता..

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर