लोकमतचा शानदार विजय

By Admin | Updated: January 23, 2016 02:54 IST2016-01-23T02:54:06+5:302016-01-23T02:54:06+5:30

लोकमतने देशोन्नतीवर नऊ गड्यांनी शानदार विजय नोंदवित शुक्रवारी १८ व्या एसजेएएन- ओसीडब्ल्यू आमंत्रित आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.

Lokmat's Superb Victory | लोकमतचा शानदार विजय

लोकमतचा शानदार विजय

शरद मिश्राची चमकदार कामगिरी
नागपूर : लोकमतने देशोन्नतीवर नऊ गड्यांनी शानदार विजय नोंदवित शुक्रवारी १८ व्या एसजेएएन- ओसीडब्ल्यू आमंत्रित आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आजच्या दुसऱ्या सामन्यात लोकशाही वार्ता संघाने तरुण भारतचा २७ धावांनी पराभव केला.
दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या देशोन्नतीला २० षटकांत सर्वबाद ८९ धावांत गुंडाळल्यानंतर लोकमतने विजयी लक्ष्य ९.५ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात गाठले. देशोन्नतीकडून अक्षय माटेगावकर २९ आणि सचिन कांचनवार १७ यांनी थोडाफार प्रतिकार केला. शरद मिश्रा, देवेन सदावर्ती आणि प्रवीण लोखंडे यांनी लोकमतकडून प्रत्येकी दोन गडी बाद केले. शरद मिश्रा याने ३९ चेंडूत नऊ चौकारांसह ५९ धावा ठोकल्या. कर्णधार अमित खोडके याने नाबाद २३ धावांचे योगदान दिले. मिश्रा सामनावीर ठरला. वसंतनगर मैदानावर लोकशाही वार्ताने ९ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा उभारल्या. त्यात मधल्या फळीतील निखिल केळापुरे याच्या दहा चौकारांसह काढलेल्या ६० धावा प्रमुख ठरल्या. अभिषेक कुलकर्णी २६ आणि सचिन कडबे २३ यांनीही आक्रमक फलंदाजी केली. तरुण भारत संघाचा डाव ७ बाद १४५ धावांत थांबला. नितीन बैतुले ४६, मन्नू बावा ३७ आणि अंकुश हिवराळे १७ यांनी धावा केल्या पण अन्य फलंदाज अपयशी ठरले. केळापुरे सामन्याचा मानकरी ठरला. त्याआधी सकाळी आ. गिरीश व्यास यांच्याशीे दोन्ही संघांचा परिचय करून देण्यात आला.
आज शनिवारी लोकमत विरुद्ध दै. भास्कर हा सामना वसंत नगर मैदान येथे सकाळी ९.३० पासून तसेच टाइम्स आॅफ इंडिया विरुद्ध तरुण भारत हा सामना डॉ. आंबेडकर कॉलेज मैदानावर सकाळी १०.१५ पासून खेळविला जाईल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Lokmat's Superb Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.