लोकमतची शानदार सलामी

By Admin | Updated: January 12, 2017 01:49 IST2017-01-12T01:49:44+5:302017-01-12T01:49:44+5:30

नितीन श्रीवास, नितीन पटारिया यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर सचिन तुरकने मोक्याच्या क्षणी टिपलेल्या अप्रतिम झेलमुळे ....

Lokmat's Great Salute | लोकमतची शानदार सलामी

लोकमतची शानदार सलामी

एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट : श्रीवास, पटारिया, तुरक यांची चमक
नागपूर : नितीन श्रीवास, नितीन पटारिया यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर सचिन तुरकने मोक्याच्या क्षणी टिपलेल्या अप्रतिम झेलमुळे लोकमतने स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे (एसजेएएन) आयोजित १९ व्या ओसीडब्ल्यू-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेत बुधवारी टाइम्स आॅफ इंडिया-महाराष्ट्र टाइम्स संघावर ४४ धावांनी विजय साजरा केला.
दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर लोकमतने निर्धारित षटकांत ४ बाद २०८ धावा केल्या. सामनावीर ठरलेल्या नितीन श्रीवासने सर्वाधिक नाबाद ६७ धावांचे (३० चेंडू, ४ चौकार, ५ षटकार) योगदान दिले. नितीन पटारियाने ५१ धावा ठोकल्या. विजयाचा पाठलाग करणारा टीओआय-मटा संघ ६ बाद १६४ पर्यंत मजल गाठू शकला. सुबोध रत्नपारखीने ३२ धावा (२० चेंडू, ४ चौकार) केल्या. आशिष बुधोलियाने तीन गडी बाद केले. सचिन तुरकने तीन अप्रतिम झेल टिपले. वसंतनगर मैदानावर हितवादने निर्धारित २० षटकांत ८ बाद १४० धावा केल्या. लोकशाही वार्ता संघाने निर्धारित षटकांत ९ बाद १२३ धावा केल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. राहुल दीक्षित सामनावीर ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Lokmat's Great Salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.