लोकमतच्या दीपोत्सवला सर्वाधिक पसंती
By Admin | Updated: October 18, 2014 03:41 IST2014-10-18T03:41:20+5:302014-10-18T03:41:20+5:30
दिवाळीला लाडू, चकली, करंजी या फराळासोबत दर्जेदार दिवाळी अंकांसोबत इतर वाचनीय पुस्तकांचा फराळ देण्यासाठी शंकरनगर चौक येथील

लोकमतच्या दीपोत्सवला सर्वाधिक पसंती
नागपूर : दिवाळीला लाडू, चकली, करंजी या फराळासोबत दर्जेदार दिवाळी अंकांसोबत इतर वाचनीय पुस्तकांचा फराळ देण्यासाठी शंकरनगर चौक येथील महाराणा प्रताप स्मृती सभागृहात ‘दिवाळी ग्रंथ महोत्सव’ाचे आयोजन करण्यात आले आहे. यात लोकमतच्या दीपोत्सवला सर्वाधिक पसंती मिळत आहे.
मराठी दिवाळी अंकांना फार मोठी परंपरा आहे. उत्कृष्ट दिवाळी अंक प्रसिद्ध करणे ही अभिमानाची बाब मानली जाते. दरवर्षी चांगला दिवाळी अंक कोणता यांची चर्चा वाचकांमध्ये असते. सर्व दिवाळी अंक एकाच ठिकाणी पाहता यावे यासाठी फेमस बुक सेंटरच्यावतीने हे प्रदर्शन भरविले जात आहे. यंदा प्रदर्शनाचे हे १५वे वर्ष आहे. पुस्तक प्रदर्शन व विक्री ५ आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. या सेंटरचे प्रमोद मुळे यांनी सांगितले, यंदाच्या या ‘दिवाळी ग्रंथ महोत्सव’ात ७० हजार पेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विविध १०० वर प्रकाशनची पुस्तके येथे आहेत.
विशेष म्हणजे, ३०० पेक्षा जास्त दिवाळी अंक आहेत. या प्रदर्शनात पुस्तक पाहणे सोपे जावे यासाठी पुस्तकांची विषयवार मांडणी करण्यात आली आहे. चरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या, ललित, धार्मिक, आध्यात्मिक, बाल साहित्य, फुले-आंबेडकर साहित्य, आरोग्य आणि पाककृतीवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत. या शिवाय अनेक जुनी दुर्मिळ पुस्तकेही येथे आहेत. प्रत्येक पुस्तकावर १० टक्के सूट देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)