शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:03 IST

नागपूर शहराचा वेगाने विकास होत आहे. लोकसंख्या २७ लाखांपेक्षा जास्त आहे. प्रत्येकाला हक्काचे घर हवे आहे. लोकमतच्या प्रॉपर्टी एक्स्पोमधून घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांना मार्गदर्शन आणि आर्थिक बचतीच्या योजनांचा नक्कीच फायदा मिळेल. सातत्याने आयोजन करीत असलेल्या लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोला नागरिकांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देमहापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटनएकाच छताखाली फ्लॅट, प्लॉट, फॉर्म हाऊस, रो-हाऊस, बंगले, दुकान खरेदीचे पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे तीन दिवसीय आयोजन हॉटेल सेंटर पॉर्इंट, रामदासपेठ येथे शुक्रवार, २३ मार्चपासून सुरू झाले. उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी एक्स्पोचे प्रायोजक पुष्कर होम्स प्रा.लि.चे संचालक विशाल अग्रवाल व कार्तिक अय्यर, सहप्रायोजक अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर्सचे नरेंद्र मल्लेलवार व राहुल मल्लेलवार, पायोनियर कन्स्ट्रक्शनचे अनिल नायर, आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर्सचे अमित जयस्वाल, स्टेट बँक आॅफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक प्रकाश बरोड व रवींद्र पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. नंदा जिचकार यांनी सर्व स्टॉलची पाहणी करून संचालकांना शुभेच्छा दिल्या.प्रॉपर्टी खरेदीची सर्वोत्तम संधीलोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये नागपूरकरांना विश्वसनीय प्रॉपर्टी खरेदीची संधी असल्यामुळे ते या एक्स्पोची वाट पाहतात. एक्स्पोमध्ये एकाच छताखाली फ्लॅट, प्लॉट, फॉर्म हाऊस, रो-हाऊस, बंगले, दुकान खरेदीचे पर्याय किफायत दरात आहेत. खरेदीसाठी नामांकित बँका व वित्तीय संस्थांचे कमी व्याजदरातील गृहकर्ज उपलब्ध आहेत. सोबत नामांकित रिअल इस्टेट कंपन्यांच्या ग्राहकांसाठी अनेक आर्थिक बचतीच्या योजना आहेतच. योजनेंतर्गत खरेदी करणे ग्राहकांना नेहमीच फायद्याचे असते. याशिवाय विशेष योजनेत पंतप्रधान निवासी योजनेचा २.६७ लाखांपर्यंत लाभ ग्राहकांना देण्यात येत आहे. शिवाय आयोजकांतर्फे दरदिवशी काढण्यात येणाऱ्या भाग्यशाली सोडतीतून एक्स्पोला भेट देणाºयांना आकर्षक भेटवस्तू मिळविण्याची संधी आहे.प्रारंभी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी लोकमतचे उपमहाव्यवस्थापक (उत्तर महाराष्टÑ-जाहिरात) आसमान सेठ, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) सोलोमन जोसेफ और आणि जाहिरात विभागाचे अन्य सहयोगी व स्टॉलचे संचालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये २५ कंपन्यांचा सहभाग आहे. मुख्य प्रायोजक पुष्कर होम्स प्रा. लि., सहप्रायोजक अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., पायोनियर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. आणि आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत. 

टॅग्स :HomeघरLokmat Eventलोकमत इव्हेंट