लोकमत प्रॉपर्टी एक्स्पो सर्वोत्तम
By Admin | Updated: March 23, 2015 02:22 IST2015-03-23T02:22:25+5:302015-03-23T02:22:25+5:30
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये अखेरच्या दिवशी प्रत्येक कंपन्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होती.

लोकमत प्रॉपर्टी एक्स्पो सर्वोत्तम
नागपूर : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये अखेरच्या दिवशी प्रत्येक कंपन्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होती. प्रत्येकाने प्रॉपर्टी आणि सवलतीची माहिती जाणून घेतली. अनेकांनी बुकिंग केली.
सिव्हिल लाईन्स येथील हिस्लॉप कॉलेजलगत चिटणवीस सेंटरच्या वातानुकूलित हॉलमध्ये एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. एकूण १६ स्टॉलवर नामांकित बिल्डर्स व डेव्हलपर्सच्या विविध प्रॉपर्टी विक्रीस प्रदर्शित केल्या होत्या. हॉलबाहेर ओरेवा ई-बाईकचा आकर्षक स्टॉल होता. टाटा रिअॅलिटी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (कॅपिटल हाईट्स) हे एक्स्पोचे मुख्य प्रायोजक तर टेकॉप्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. सहप्रायोजक आहेत. आहे. एक्स्पोमध्ये प्रवेश आणि पार्किंग नि:शुल्क होते.
टाऊनशिपमध्ये फ्लॅट व डुप्लेक्सचे पर्याय
विविध कंपन्यांनी प्रदर्शित केलेल्या टाऊनशिपमध्ये फ्लॅट, डुप्लेक्स, बंगलो आणि फार्म हाऊस खरेदीचे पर्याय होते. अनेकांनी व्यावसायिक युनिटला पसंती दिली. पुढील काही दिवसांत आवडते युनिट खरेदी करण्याचा मानस अनेकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नामांकित बँक आणि वित्तीय संस्थांतर्फे कर्ज पुरवठा करण्यात आला. निवास, व्यावसायिक आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने उपयुक्त योजना होत्या. ओरेव्हा बाईक्स आणि श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोचे गिफ्ट पार्टनर होते.
एक्स्पोमध्ये सहभागी स्टॉल
लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये टाटा रिअॅलिटी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, टेकॉप्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., एचडीएफसी होम लोन, जीबीटी बिल्ड टेक प्रा. लिमिटेड, एक्सॉन हाऊस, हरीहर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, गुडधे हाऊसिंग डेव्हलपर्स अॅण्ड प्रमोटर्स, पडोळे न्यू प्रॉपर्टी लॅण्ड डेव्हलपर्स, आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर्स, अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर, नक्षत्र बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स, ओम शिवम बिल्डकॉन, आनंद डेव्हलपर्स, श्री सृष्टी फार्म्स, अजंता ओरेव्हा ई-बाईक आदींचे स्टॉल होते.
एक्स्पो सुटसुटीत
लोकमतचा प्रॉपर्टी एक्स्पो व्यवस्थित आणि सुटसुटीत आहे. प्रत्येक प्रॉपर्टी एकाच छताखाली असल्याने आम्हाला पाहणे सोपे झाले. गुंतवणुकीच्या दृष्टीने एक्स्पोमध्ये आलो. काही बिल्डर्सच्या टाऊनशिप खरेदीच्या दृष्टीने उत्तम आहे.
सुनीता श्याम शेंडे
निर्णय घेण्यास योग्य
एक्स्पो प्लॉट वा फ्लॅट खरेदीसाठी योग्य आहे. सर्व कंपन्यांनी एकत्र प्रॉपर्टी प्रदर्शित केल्यामुळे निर्णय घेण्यास वेळ लागणार नाही. एकाच ठिकाणी लोकेशन आणि त्याच्या किमती कळत असल्याने एक्स्पोचे आयोजन सर्वोत्तम आहे.
प्रतिभा लीलाधर कानपिल्लेवार
खरेदीसाठी चॉईस
या एक्स्पोमध्ये खरेदीसाठी चॉईस आहे. सुटसुटीत आणि मोकळे स्टॉल आहेत. प्रत्येक स्टॉलवर उत्तम माहिती देण्यात येत आहे. लोकमतचा एक्स्पो असल्याने सर्व प्रॉपर्टीवर विश्वास आहे. शॉप खरेदीसाठी कंपन्यांची प्रॉपर्टी बघितली.
डॉ. नमिता अशोक शेंदरे
गुंतवणुकीसाठी योग्य
या प्रदर्शनात गुंतवणुकीच्या दृष्टीने मंजूर आणि सर्वोत्तम प्रॉपर्टी आहेत. पण बारकाईने पाहिल्यास सर्वच शहराबाहेरील आहेत. शहरात शॉप खरेदीसाठी पर्याय नाही. सर्व प्रॉपर्टी एकाच छताखाली असल्याने एक्स्पो उत्तम आहे.
पल्लवी राजू मोटघरे
सर्वोत्तम आयोजन
लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन सर्वोत्तम आहे. विविध कंपन्यांच्या टाऊनशिपमध्ये घरकुल खरेदीसाठी आकर्षक योजना आहेत. संपूर्ण माहिती एकाच छताखाली असून आयोजन उत्तमरीत्या आणि नियोजनबद्ध आहे.
वैशाली भांडारकर
खरेदी करणे सोपे
शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्ण आयोजन असून सर्वच स्टॉलवर गर्दी आहे. प्रॉपर्टी एक्स्पोच्या आयोजनाने ग्राहकांना सर्व प्रॉपर्टीची माहिती मिळते व खरेदी करणे सोपे जाते. आकर्षक योजनांची माहिती एकाच छताखाली मिळाली.
माधवी घिमे