शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

लोकमत पॉझिटिव्ह स्टोरी:  एका किडनीच्या भरवशावर कोरोनाला दिली मात; ८२ वर्षीय पुष्पाताईसुद्धा झाल्या बऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 06:20 IST

लोकमत पॉझिटिव्ह स्टोरी: सकारात्मक विचारांनी संक्रमणमुक्त होण्यास मिळाली मदत

- योगेंद्र शंभरकर 

नागपूर : शहरात दररोज कोरोना संक्रमणामुळे युवकांसह धडधाकट व्यक्तींचा मृत्यू होत आहे. मात्र, अशा स्थितीतही सकारात्मक विचारांनी कोरोना संक्रमणाला मात दिली जाऊ शकते, असेच एक उदाहरण ५६ वर्षीय महिला मेघा अरविंद भांदककर यांनी सादर केले आहे. दोन वर्षांपूर्वी गंभीर आजारामुळे त्यांचे एक मूत्रपिंड (किडनी) निकामी झाले होते. ऑपरेशननंतर त्यांना एकच मूत्रपिंड आहे. अशा स्थितीत २७ मार्च रोजी त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोना चाचणी केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतु, हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला नसल्याने काही दिवस घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान, त्यांचा सिटी स्कोर १२पर्यंत पोहोचला आणि फुप्फुसांमध्ये ५० टक्के इन्फेक्शन पसरले होते. मुलगा नितीशच्या परिश्रमानंतर त्यांना १ एप्रिल रोजी छत्रपती चौक येथील एका खासगी इस्पितळात बेड मिळाले. मात्र, त्यांच्या प्रकृतीचा पूर्वइतिहास बघता आणि वर्तमान प्रकृती बघता उपचारात भारी डोस देण्यास डॉक्टर कचरत होते. परंतु, मेघा भांदककर यांनी धीर सोडला नाही. पूर्णत: सुदृढ होऊन घरी परतायचे आहे, असा ठाम निश्चय केला. औषधांच्या नियमित मात्रा व व्यवस्थित आहाराने त्यांच्या आरोग्यात आठवडाभरातच आश्चर्यजनक सुधारणा झाली. पूर्णत: संक्रमणमुक्त झाल्यावर त्यांनी इस्पितळातील डॉक्टर व आरोग्यसेवकांसह फोटो काढून त्या घरी परतल्या.

आई घाबरली नाही

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरही आई घाबरली नाही. उलट आई मलाच सकारात्मक विचार ठेवण्यास प्रवृत्त करत होती. एका किडनीच्या भरवशावर हिमतीने ती सुदृढ होऊन घरी परतली आहे. ती आजही इतर सामान्य महिलांप्रमाणे घरातील कामे करत असल्याचे नितीश भांदककर यांनी सांगितले.

सकारात्मकतेने झाले कोरोनामुक्त

किडनीच्या गंभीर आजारातही मी घाबरली नाही. एकच किडनी असताना कोरोना संक्रमण झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्य घाबरले होते. मात्र, मी बरी होईल, असा आत्मविश्वास होता, असे मेघा भांदककर म्हणाल्या.

८२ वर्षीय पुष्पाताईसुद्धा बऱ्या झाल्या

हॉस्पिटलमध्ये आईसोबतच एक अन्य ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक पुष्पाताईसुद्धा उपचारासाठी भरती झाल्या होत्या. या काळात आई आणि पुष्पाताई एकमेकांमध्ये मिसळून गेल्या होत्या. दोघांनीही लवकरच उत्तम आरोग्यासह घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही ठीक झाल्यावर डॉक्टरांनी दोघांसोबत फोटो काढल्याचे नितीश यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर