शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आज 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 09:05 IST

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी तथा लोकमत नागपूरच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रविवारी, २ एप्रिल रोजी "भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का?' या विषयावर रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये दुपारी २.३० वाजता 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह' आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या मीडिया कॉनक्लेव्हचे उद्घाटन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार करतील. लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी राहतील.

एएनआय अर्थात एशियन न्यूज इंटरनॅशनलच्या संपादक (वृत्त) स्मिता प्रकाश, टाइम्स नेटवर्कच्या समूह संपादक नाविका कुमार, लोकमत मीडिया ग्रुपचे समूह संपादक विजय बाविस्कर, न्यूज १८चे व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगण, एबीपीचे राष्ट्रीय संपादक विकास भदौरिया, न्यूज १८ लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, पंजाब केसरी व नव्या टाइम्सचे कार्यकारी संपादक अंकू श्रीवास्तव, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, ज्येष्ठ पत्रकार व लोकमत समाचारचे पहिले संपादक एस. एन. विनोद, हिंदुस्थान टाइम्सचे सहयोगी संपादक प्रदीप मैत्र, एबीपी माझाच्या उप-कार्यकारी सरिता कौशिक या परिषदेत मते मांडणार आहेत. परिषदेतील पहिल्या सत्राचे संवादक लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव, तर दुसऱ्या सत्राचे संवादक लोकमत समाचार, नवी दिल्लीचे सहयोगी संपादक संजय शर्मा असतील.

विदर्भातील तीनशेहून अधिक पत्रकार येणार

लोकमत समूहाने खास पत्रकारांसाठी आयोजित केलेली ही पहिलीच राष्ट्रीय परिषद असून, विदर्भातील पत्रकारांना एका महत्त्वाच्या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील नामवंत पत्रकारांची मते ऐकण्याची संधी मिळणार आहे. विदर्भाच्या सर्व अकरा जिल्ह्यांमधून तीनशेहून अधिक पत्रकार उपस्थित राहणार आहेत. 

'लोकमतचा इतिहास' चित्रकृतीचे अनावरण

लोकमतच्या वाटचालीचा इतिहास मांडणाऱ्या देखण्या चित्रकृतीचे अनावरण रविवारी सायंकाळी ६ वाजता केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्याहस्ते लोकमत भवनात होणार आहे. ख्यातनाम कलावंत श्री एम नारायण यांनी ही चित्रकृती साकारली असून 'लोकमत'चा ५० वर्षांचा प्रवास ९ बाय १९ फूट आकारात चित्रित करण्यात आला असून, 'पत्रकारिता परमो धर्म'च्या वाटचालीवर आधारित हे पेंटिंग लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांना अर्पण करण्यात येणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरLokmatलोकमतMediaमाध्यमे