शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाव लोकमतचा :अखेर तो बोगस निवडणूक सर्व्हे हटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:05 IST

भारतीय जनता पक्षाच्या नावानेच एक बोगस ‘ऑनलाईन सर्व्हे’ सुरू असल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच हा बोगस निवडणूक ‘सर्व्हे’ संकेतस्थळावरून ‘डिअ‍ॅक्टिव्हेट’ करण्यात आला आहे. या ‘सर्व्हे’बाबत भाजपतर्फे पोलिसांतदेखील तक्रार करण्यात आली होती.

ठळक मुद्देदक्षिण नागपुरातील भाजप उमेदवाराबाबत होता सर्व्हे : कोणी केला खोडसाळपणा ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नावानेच एक बोगस ‘ऑनलाईन सर्व्हे’ सुरू असल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच हा बोगस निवडणूक ‘सर्व्हे’ संकेतस्थळावरून ‘डिअ‍ॅक्टिव्हेट’ करण्यात आला आहे. या ‘सर्व्हे’बाबत भाजपतर्फे पोलिसांतदेखील तक्रार करण्यात आली होती.इंटरनेटवर ‘स्ट्रॉपोल’ या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन सर्व्हे’चे एक ‘पेज’ बनविण्यात आले होते. या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरच हा ‘सर्व्हे’ दक्षिण भाजपतर्फे घेण्यात येत असल्याचे नमूद होते. ‘२०१९ मध्ये दक्षिण नागपूूरचा आमदार कोण असावा’ असा प्रश्न यात विचारण्यात आला होता.ही बाब लक्षात येताच भाजपचे महानगर सोशल मीडिया सेलतर्फे ७ जानेवारी रोजी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पोलिसांनी त्वरित कारवाई केली नाही. ‘लोकमत’ने बुधवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच तातडीने हालचाली झाल्या. उच्चपातळीवरुनदेखील हा प्रकार गंभीरतेने घेण्यात आला व हा ‘सर्व्हे’ अखेर ‘डिअ‍ॅक्टिव्हेट’ करण्यात आला. विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह माजी आमदार मोहन मते, आशीष वांदिले व रवींद्र भोयर यांची नावे या ‘सर्व्हे’मध्ये होती. या चौघांपैकी कोण आमदार व्हावा, असे विचारण्यात येत होते. यासंदर्भात पक्षाकडून कुठलीही अंतर्गत चौकशी होणार नसली तरी कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. हा राजकीय वातावरण तापविण्यासाठी जाणुनबुजून करण्यात आलेला खोडसाळपणा आहे की पक्षातील अंतर्गत स्पर्धेतून हा प्रकार करण्यात आला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :BJPभाजपाonlineऑनलाइन