शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

लोकमत इम्पॅक्ट : नागपुरातील ‘ते’ खांब हटविण्यासाठी ४१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:21 IST

शहरातील वाहतुकीसाठी अडथळा बनलेल्या धोकादायक खांबांना हटविण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने यांना हटविण्यासाठी सुमारे ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आता नागपूर महानगरपालिका या अंदाजपत्रकाच्या आधारावर निविदा जारी करुन खांब हटविणे सुरू करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने २३ आॅक्टोबरच्या अंकात ‘जनतेपासून वसुली झाल्यानंतरदेखील रस्त्यांवर खांब उभे असल्याच्या बाबीवर प्रकाश टाकला होता व या माध्यमातून जनतेच्या पैशांची कशी लूट होत आहे, याचा खुलासा केला होता हे विशेष.

ठळक मुद्देशहरात हजारहून अधिक धोकादायक खांब : जनतेकडून घेण्यात आले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाहतुकीसाठी अडथळा बनलेल्या धोकादायक खांबांना हटविण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने यांना हटविण्यासाठी सुमारे ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. आता नागपूर महानगरपालिका या अंदाजपत्रकाच्या आधारावर निविदा जारी करुन खांब हटविणे सुरू करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने २३ आॅक्टोबरच्या अंकात ‘जनतेपासून वसुली झाल्यानंतरदेखील रस्त्यांवर खांब उभे असल्याच्या बाबीवर प्रकाश टाकला होता व या माध्यमातून जनतेच्या पैशांची कशी लूट होत आहे, याचा खुलासा केला होता हे विशेष.मनपाच्या खराब आर्थिक स्थितीमुळे २००१-०२ मध्ये शहरात ‘आयआरडीपी’अंतर्गत रस्ते रुंदीकरणादरम्यान रस्त्यांच्या मध्ये आलेले १ हजार ८७ खांब हटले नव्हते. महावितरण व मनपा यासाठी आवश्यक असलेल्या ९१ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अर्धाअर्धा उचलतील, असे २०११ मध्ये निश्चित झाले. महावितरणने वीज नियामक आयोगाकडून आपला हिस्सा देण्यासाठी तीन वर्षांपर्यंत वीज बिलांच्या माध्यमातून ९ पैसे प्रति युनिटप्रमाणे जनतेकडून वसुली केली. परंतु मनपा-महावितरणने केवळ प्रत्येकी २० कोटी ५० लाख रुपयेच खर्च केले. ४१ कोटींचे काम झाल्यावर खांब हटविणेच बंद करण्यात आले. ५० कोटींची कामे प्रशासकीय प्रक्रियेत अडकली आहेत. यादरम्यान नवीन सिमेंट मार्ग बनविल्यामुळे काही खांब हटले. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मनपाच्या पुढाकारातून महावितरणने खांब हटविण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले आहे. कंपनीच्या चमूने रस्त्यांचे सर्वेक्षण करुन ५३ कोटी ३२ लाख रुपयांचे काम निश्चित केले. यातील काही जागांवर खांब हटविण्याची आवश्यकता नसल्याची बाबदेखील लक्षात आली. अखेर या कामासाठी ४१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या कामासाठी महावितरणने अगोदरच जनतेकडून वीजबिलांच्या माध्यमातून २० कोटी ५० लाख रुपये वसूल केले आहे. तर मनपाचा दावा आहे की त्यांना यासाठी राज्य शासनाकडून अनुदान व कर्ज प्राप्त झाले आहे.कुठले खांब हटणार ?या माध्यमातून शहरातील विविध भागांतील खांब हटविण्यात येतील. यात रिंग रोड ते रामेश्वरी, वर्धमान नगर चौक ते विकास चौक, बोरगांव ते अवस्थी नगर, क्रीड़ा चौक ते तुकड़ोजी पुतळा, १० नंबर पूल ते आंबेडकर चौक, आंबेडकर रोड ते मनपा तलाव, छिंदवाड़ा रोड ते काटोल मार्ग, रेल्वे फीडर ते शहीद चौक, इतवारी रोड ते कामठी रोड, कामठी रोड ते अशोक चौक, म्हाळगी नगर से नरेंद्र नगर, ग्रेट नाग रोड ते जगनाड़े चौक, गजानन विद्यालय ते हुड़केश्वर मार्ग, दोसर भवन ते कब्रस्तान आणि बड़कस चौक ते सक्करदरा यामधील खांबांचा समावेश असेल.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर