शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकमत मदतीचा हात : ब्लड कॅन्सरशी झुंजते चिमुकली उन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 02:17 IST

अवघ्या तीन वर्षाची उन्नती. कॅन्सर म्हटले की कुणाच्याही मनात धडकी भरते. तिला मात्र आपण कुठल्या मोठ्या आजाराच्या विळख्यात सापडलो याची जाणीवही नाही. तिच्या चेहऱ्यावर आहे ती गोड निरागसता. तिला जाणीव नसली तरी आपल्या गोंडस बाळाच्या चिंतेने आईवडिलांचे डोळे व्याकुळ झाले आहेत. तुटपुंजी मिळकत, त्यातही लॉकडाऊनमुळे तीही बंद झाल्याने उपचाराचा खर्च कसा करावा, या प्रश्नाने वडिलांना असहाय्य केले आहे.

ठळक मुद्देसुरक्षा गार्ड वडिलांची धडपड : मदतीसाठी हवी संवेदनेची साथ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या तीन वर्षाची उन्नती. कॅन्सर म्हटले की कुणाच्याही मनात धडकी भरते. तिला मात्र आपण कुठल्या मोठ्या आजाराच्या विळख्यात सापडलो याची जाणीवही नाही. तिच्या चेहऱ्यावर आहे ती गोड निरागसता. तिला जाणीव नसली तरी आपल्या गोंडस बाळाच्या चिंतेने आईवडिलांचे डोळे व्याकुळ झाले आहेत. तुटपुंजी मिळकत, त्यातही लॉकडाऊनमुळे तीही बंद झाल्याने उपचाराचा खर्च कसा करावा, या प्रश्नाने वडिलांना असहाय्य केले आहे.समाधाननगर, पोलीस लाईन टाकळी येथे राहणारे रवींद्र तिवारी हे सुरक्षा रक्षक म्हणून सेवारत होते. या तुटपुंज्या कमाईतच ते पत्नी व दोन मुलांचा संसार चालवीत आहेत. या परिस्थितीत काळही जणू त्यांची परीक्षा घ्यायला टपलेला. त्यांची लहान मुलगी उन्नती वारंवार आजारी पडते म्हणून डॉक्टरांच्या सूचनेनुसार काही चाचण्या केल्या आणि ती अनामिक भीती खरी ठरली. उन्नतीला ब्लड कॅन्सर आहे. डॉक्टरांचे हे शब्द कुणीतरी आघात केल्यासारखे होते. काय करावे, या विचाराने डोके सुन्न झाले. पण खचून जाऊन, निराश होऊन चालणार नव्हते.उन्नतीला महिनाभरापूर्वी जामठास्थित कॅन्सर रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅन्सर असला तरी तो पहिल्या स्टेजमध्ये आहे आणि उपचाराने तो बरा होऊ शकतो, या डॉक्टरांच्या शब्दाने त्यांना मोठा दिलासा दिला. आता प्रश्न होता उपचाराची व्यवस्था करण्याचा. त्यांनी निकाराचे प्रयत्न चालविले. जवळ असलेली सर्व जमापुंजी आतापर्यंतच्या उपचारात लावली. शासकीय योजनेतून मुलीच्या किमोथेरपीची व्यवस्था झाली पण इतर उपचारासाठी आणखी पैशाची गरज, पूर्ण उपचार करण्यासाठी ७ ते ८ लाख खर्च येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. मित्र, नातेवाईक अशा सर्वांकडून त्यांनी मदत घेतली. मुलीला जगविण्यासाठी कुठलेही प्रयत्न अपुरे राहू नये, ही वडिलांची भावना. मात्र खर्चाचा डोंगर पार करायला या सामान्य सुरक्षा गार्डचे प्रयत्न अपूर्ण ठरतात की काय, ही भीती त्यांना सतावत आहे.निरागस उन्नतीला वाचविण्यासाठी यावेळी समाजाच्या संवेदनेची गरज आहे. उन्नती कॅन्सरच्या पहिल्या स्टेजवर आहे आणि नक्कीच जगू शकते, मात्र पैशाअभावी उपचार थांबू नये. त्यामुळे संवेदनशील नागरिकांनी सढळ हाताने तिच्या उपचारासाठी पुढे येण्याची गरज आहे तरच निष्पाप उन्नतीच्या चेहरा पुन्हा हास्याने फुलेल.ज्या नागरिकांना उन्नतीच्या उपचारासाठी मदत करायची असेल त्यांनी रवींद्र तिवारी यांच्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या ३३५७५०८७४४ या खाते क्रमांकावर मदत जमा करावी. बँक शाखेचा आयएफएससी कोड ‘सीबीआयएनओ२८३५७२’ असा आहे. उन्नतीच्या तब्बेतीबाबत किंवा मदतीबाबत आपण रवींद्र तिवारी यांच्या ८३०८२६०९८७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.

टॅग्स :Lokmatलोकमतnagpurनागपूरcancerकर्करोग