लोकमत इव्हेंट एक्सलन्स अवॉर्ड्सची घोषणा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:07 IST2021-03-31T04:07:46+5:302021-03-31T04:07:46+5:30
- सक्सेस स्टोरिज् असलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण होणार लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमत इव्हेंट एक्सलन्स अवॉर्ड २०२१च्या ...

लोकमत इव्हेंट एक्सलन्स अवॉर्ड्सची घोषणा आज
- सक्सेस स्टोरिज् असलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण होणार
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत इव्हेंट एक्सलन्स अवॉर्ड २०२१च्या पुरस्कारांची घोषणा आणि अवॉर्ड्सप्राप्त व्यक्तींच्या सक्सेस स्टोरिज् असलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण बुधवारी, ३१ मार्च रोजी आभासी माध्यमाद्वारे होणार आहे.
या पुरस्कारांकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून इव्हेंट्ससंबंधित शंभराहून अधिक प्रवेशिकांचा समावेश आहे. या इव्हेंट एक्सलन्स कॉफी टेबल बुकचे अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी, प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी व लोकमत मीडिया प्रा. लि.,चे चेअरमन विजय दर्डा व लोकमत मीडिया प्रा. लि.,चे कार्यकारी संचालक करणबाबू दर्डा यांच्याहस्ते होणार आहे.
या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील इव्हेंट्सशी संबंधित संस्था, प्रतिष्ठाने व व्यक्तींचा विचार केला गेला आहे. या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी link_lokmateventsnagpur या लिंकवर .क्लिक करून सहभागी होता येईल.
...............