‘लोकमत दीपोत्सव’ : दर्जेदार आणि कलात्मकही - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:59 IST2018-11-05T21:57:30+5:302018-11-05T21:59:53+5:30
"'लोकमत दीपोत्सव’ची मला दरवर्षी उत्सुकता असते. यावर्षीचाही अंक तेवढाच दर्जेदार आणि कलात्मक आहे", अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज ‘लोकमत दीपोत्सव’ची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

‘लोकमत दीपोत्सव’ : दर्जेदार आणि कलात्मकही - नितीन गडकरी
ठळक मुद्देलोकमत दिवाळी अंकाचे केले कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : "'लोकमत दीपोत्सव’ची मला दरवर्षी उत्सुकता असते. यावर्षीचाही अंक तेवढाच दर्जेदार आणि कलात्मक आहे", अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज ‘लोकमत दीपोत्सव’ची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘लोकमत’चे प्रत्येक काम दर्जेदार असते, गुणवत्तेशी कधीच तडजोड केली जात नाही. अगदी संपादनापासून तर छपाईपर्यंत प्रत्येक गोष्ट कटाक्षाने जपली जाते. हेच ‘लोकमत’च्या देदीप्यमान यशाचे गमक आहे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.