लोकमत ‘दीपोत्सव’चे आज लोकार्पण
By Admin | Updated: November 5, 2015 03:23 IST2015-11-05T03:23:44+5:302015-11-05T03:23:44+5:30
मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते अशा ‘लोकमत दीपोत्सव’ अंकाचा लोकार्पण

लोकमत ‘दीपोत्सव’चे आज लोकार्पण
नागपूर : मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते अशा ‘लोकमत दीपोत्सव’ अंकाचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि. ५ नोव्हेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. रामदासपेठ येथील लोकमत भवनच्या एडिटोरियल कॉन्फरन्स हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता हा समारंभ होईल. ज्येष्ठ कवी- साहित्यिक आणि विभागीय आयुक्त अनुपकुमार श्रीवास्तव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर, ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी, प्रख्यात लेखक-कादंबरीकार रवींद्र शोभणे आणि प्रख्यात आर्टिस्ट विवेक रानडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.