लोकमत धमाल दांडिया

By Admin | Updated: December 2, 2015 15:17 IST2015-12-02T03:11:30+5:302015-12-02T15:17:33+5:30

प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगच्या उपस्थितीत लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान प्रस्तुत आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी पडली.

Lokmat Chhamal Dandiya | लोकमत धमाल दांडिया

लोकमत धमाल दांडिया

नागपूर, दि. १- प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगच्या उपस्थितीत लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान प्रस्तुत आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी पडली. चिटणीस पार्क, महाल येथे प्रचंड उत्साहात आणि अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत देखण्या नृत्याविष्काराने नागपूरच्या चमूने प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांकावर गडचिरोली तर तृतीय क्रमांकावर गोव्याच्या चमूने बाजी मारली.

यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम, स्टार प्रवाहच्या 'दुर्वा' मालिकेची नायिका ऋता दुरगुले, सुप्रसिद्ध लोकगीत गायक व पार्श्‍वगायक अरविंद वेगळा, आ. प्रकाश गजभिये, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत बोदड उपस्थित होते. तसेच स्पर्धेचे परीक्षक राजेश सेदानी, कोरिओग्राफर किरण भेले, वात्सल्य ग्रुप व ग्लिस्टेन हॉटेलचे संचालक अमित गाडगे, युनिक स्लीम पॉईंट अँड ब्युटी क्लिनीकच्या संचालिका डॉ. रिचा जैन, जैन सहेली मंडळाच्या कोषाध्यक्ष अनुजा छाजेड, लोकमत वृत्तपत्र समूहाचे प्रेसिडेंट (सेल्स) करुण गेरा, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत टाइम्सचे कार्यकारी संपादक एन. के. नायक, लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान होते.

Web Title: Lokmat Chhamal Dandiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.