‘लोकमत एस्पायर’ हाऊसफुल्ल
By Admin | Updated: June 4, 2017 02:08 IST2017-06-04T02:08:08+5:302017-06-04T02:08:08+5:30
लोकमतचे पाचवे शैक्षणिक प्रदर्शन ‘एस्पायर’च्या दुसऱ्या दिवशी पालक आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती.

‘लोकमत एस्पायर’ हाऊसफुल्ल
पालक आणि विद्यार्थ्यांची कॉलेजसाठी विचारणा : एकाच छताखाली संपूर्ण माहिती, आज अखेरचा दिवस
नागपूर : लोकमतचे पाचवे शैक्षणिक प्रदर्शन ‘एस्पायर’च्या दुसऱ्या दिवशी पालक आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. पुणे व नागपूर येथील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांशी संलग्न कॉलेजमधील इंजिनिअरिंग आणि अन्य कोर्सेची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. तीन दिवसीय प्रदर्शन हॉटेल सेंटर पॉर्इंट, रामदासपेठ येथे सुरू असून रविवार, ४ जून अखेरचा दिवस आहे.
एकाच छताखाली माहिती उपलब्ध
प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील विद्यापीठातील विविध कोर्सेस आणि कॉलेजची माहिती एकाच छताखाली उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना सर्व शैक्षणिक माहिती सहजरीत्या मिळत आहे. त्यातून कॉलेजची निवड करणे शक्य होणार आहे. देवश्री गौतम या विद्यार्थिनीने सांगितले की, बारावीत ७८ टक्के गुण मिळाले आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. पुणे येथील कॉलेजची माहिती जाणून घेतली. प्रवेश प्रक्रियेद्वारे या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे सोपे होणार आहे. विभास देवांगण या विद्यार्थ्याने पुणे येथील इंजिनिअरिंग कॉलेजची विस्तृत माहिती घेतल्याचे सांगितले. त्याने आई-वडिलांसोबत ‘एस्पायर’ला भेट दिली. हे प्रदर्शन माहितीपर असल्याचे तो म्हणाला. एकाच ठिकाणी उच्च शिक्षणाची माहिती उपलब्ध असल्यामुळे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचे त्याने सांगितले.
‘स्पेशल ग्रॅज्युएशन सेल्फी पॉर्इंट’ उपक्रम
लोकमत शैक्षणिक प्रदर्शन ‘एस्पायर’ प्रदर्शनात रविवार, ४ जूनला विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रदर्शनाला भेट देणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी आयोजकांतर्फे विशेष पोशाख देण्यात येणार आहे. पोशाख घालून त्यांना सेल्फी काढायची आहे. हा उपक्रम दिवसभर सुरू राहील. या उपक्रमाचा फायदा घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शांतनू शेंडे मोबाईलचे विजेते
लोकमत शैक्षणिक प्रदर्शन ‘एस्पायर’मध्ये दुसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या भाग्यशाली सोडतीत पंचशीलनगर येथील रहिवाशी शांतनू मनोजकुमार शेंडे विजेते ठरले आहेत. त्यांना भेट स्वरुपात मोबाईल फोन मिळणार आहे. प्रदर्शनात येणारी प्रत्येक व्यक्ती भाग्यशाली विजेता ठरू शकतो.
आज सहा सेमिनार
सकाळी ११ वाजता
विषय : पदवीचे शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी.
वक्ते : बापू बबन गायकवाड, नागपूर शाखा प्रमुख, द युनिक अकॅडमी.
सकाळी १२ वाजता
विषय : दहावीतील विद्यार्थ्यांसाठी डीएमआयटीद्वारे करिअर मार्गदर्शन.
वक्ते : प्रा. ममता जोशी सावजी, संचालक,
करिअर कौन्सिलर व डीएमआयटी तज्ज्ञ, पुणे.
दुपारी ३ वाजता
विषय : क्लिनिकल रिसर्च इंंडस्ट्रीमध्ये करिअरच्या संधी.
वक्ते : सुमन आर. मेमॉन
दुपारी ४ वाजता
विषय : सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा.
वक्ते : प्रा. धर्मेंद्र ठाकूर
दुपारी ५ वाजता
विषय : सिम्बॉयसिससह कौशल्य विकास.
प्रा. विजय मासरकर,
सिम्बॉयसिस स्कील व ओपन युनिव्हर्सिटी.
सायंकाळी ६ वाजता
विषय : आयआयटी, नीट व सॅटवर पालकांसाठी जनजागृती कार्यक्रम.
वक्ते : व्हेलॉसिटी इन्स्टिट्यूट हैदराबादचे तज्ज्ञ.