लोकसभा निवडणूक निकाल २०१९; विदर्भात भाजपाची घोडदौड; सेना दुसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 17:43 IST2019-05-23T17:43:15+5:302019-05-23T17:43:59+5:30
लोकसभेच्या निवडणूक निकालाच्या घोडदौडीत भाजपाने विदर्भात पाच जागांवर आगेकूच सुरू ठेवली असून सेनेने पाठोपाठ आपला नंबर लावला आहे.

लोकसभा निवडणूक निकाल २०१९; विदर्भात भाजपाची घोडदौड; सेना दुसऱ्या क्रमांकावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लोकसभेच्या निवडणूक निकालाच्या घोडदौडीत भाजपाने विदर्भात पाच जागांवर आगेकूच सुरू ठेवली असून सेनेने पाठोपाठ आपला नंबर लावला आहे.
नागपुरात भाजपचे नितीन गडकरी हजारांनी आघाडीवर असून त्यांनी ४०९४८ मते मिळवली आहेत तर काँग्रेसचे नाना पटोले यांना २३०७० मते पडली आहेत.
चंद्रपूरचे भाजप उमेदवार हंसराज अहीर यांना २६८१३८ मते मिळाली असून काँग्रेसचे सुरेश धानोकर आघाडीवर असून यांच्या खात्यात २९३३३७ इतकी मते जमा झाली आहेत.
भंडारा-गोंदिया मतदारसंघातील भाजप उमेदवार सुनील मेंढे यांना १, ३२, ७०१ राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना ९५०४५ मते मिळाली आहेत.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार अशोक नेते यांना चौथ्या फेरीत २४४६० मते तर काँग्रेसचे नामदेव उसेंडी यांना १८९४८ मते मिळाली आहेत. वर्ध्यात भाजपाचे रामदास तडस यांनी ८० हजारांहून अधिक मते मिळवून १८ हजारांची आघाडी घेतली आहे. येथे काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना ६२७४६ मते मिळाली आहेत.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांचे मताधिक्य अधिक आहे. त्यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना ७३ हजाराहून अधिक मतांनी मागे टाकले आहे.
रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने हे आघाडीवर आहेत. त्यांना २७ हजाराहून अधिक मते आहेत तर कांग्रेसचे गजभिये सध्या २३३११ एवढ्या मतांवर आहेत.
अमरावतीमध्ये महाआघाडीच्या नवनीत राणा यांची महायुतीचे आनंदराव अडसूळ यांच्यावर ४१३१० मतांची आघाडी झाली आहे.
रामटेकमध्ये नवव्या फेरीत कृपाल तुमाने यांना २४७७६६ मते मिळाली तर किशोर गजभिये यांना २१३४६६ एवढी मते मिळाली आहेत.