शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

Lok Sabha Election 2019; देशद्रोह्यांना कुरवाळणारे सरकार हवे की फासावर लटकविणारे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 11:18 AM

देशद्रोह्यांचे संरक्षण करणारे की त्यांना फासावर लटकविणारे सरकार हवे आहे, हे ठरविण्याची वेळ आली आहे. देशद्रोह्यांना कुरवाळण्याची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून रोखा, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देउद्धव ठाकरेंचा काँग्रेसवर घणाघात शेतकऱ्यांच्या हितासाठीच युती

लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर/कन्हान : गद्दारांना धडा शिकविण्याचा रामटेकचा इतिहास आहे. काँग्रेसने सत्ता आल्यानंतर देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे जाहीरनाम्यात सांगितले आहे. त्यामुळे देशद्रोह्यांचे संरक्षण करणारे की त्यांना फासावर लटकविणारे सरकार हवे आहे, हे ठरविण्याची वेळ आली आहे. देशद्रोह्यांना कुरवाळण्याची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून रोखा, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि कन्हान येथे रविवारी आयोजित प्रचार सभेत ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्ला चढवित शेतकऱ्यांच्या हितासाठीच भाजप-सेनेची युती झाल्याचे स्पष्ट केले. कळमेश्वर येथील सभेला शिवसेना नेते डॉ.दीपक सावंत, युतीचे उमेदवार कृपाल तुमाने, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतद्दार, नगराध्यक्षा स्मृती इखार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजु हरणे, भाजप नेते रमेश मानकर, अशोक मानकर, आरपीआयचे विदर्भ प्रमुख भीमराव बन्सोड, अशोक धोटे, किरण पांडव उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, ‘जेएनयु’मध्ये देशविरोधी नारे लावणाºयांना गोंजरण्याची भाषा काँग्रेस करीत आहे. अशा लोकांसाठी कलम १२४ (अ) रद्द करण्यात येत असेल तर देशाच्या गद्दाराचे हित जोपासणाºयांना धडा शिकविलाच पाहिजे. मधल्या काळात मी शेतकºयांच्या हितासाठी रान उठविले होेते. सरकारने शेतकºयांच्या हिताचे संरक्षण करण्याची आणि शेतमालाला रास्त हमी भाव देण्याची ग्वाही दिल्यानेच भाजप-सेनेची युती झाली. देशात पुन्हा मोदी सरकार आल्यानंतर तालुकास्तरावर शेतकरी मदत केंद्र उभे केले जातील. शेतकºयांच्या सर्व समस्यांची उत्तरे या केंद्रात असतील.विरोधकांनी अजूनही पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. सत्तेसाठी संगीत खुर्ची सुरु आहे. त्यामुळे ज्यांचा नेताच स्पष्ट नाही अशा लोकांच्या हातात सत्ता देऊन देश असुरक्षित करायचा का, असा सवालही त्यांनी केला. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला देशाच्या सैनिकांनी सडेतोड उत्तर दिले. याचे पुरावे विरोधक मागत आहे. यातही शरद पवार यांनी राजकारण केल्याची टीका ठाकरे यांनी केली.विदर्भात शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. संत्रा उत्पादक त्रस्त आहे. काँग्रेसच्या सरकारमुळे शेतकºयांची ही अवस्था झाली आहे. युती सरकारने कर्ज माफी दिली. सरकार शेतकºयांच्या हितासाठी ठोस धोरणही आखत आहे. शेतकºयांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.कृपाल तुमाने यांनी रामटेक मतदार संघात झालेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडत केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकारचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले. कन्हान येथील सभेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष जयस्वाल, नगराध्यक्ष शंकर चहांदे, सतीश हरडे उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019