शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा मेसेज करून खोलीत करून घेतले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 00:19 IST

लोहमार्ग पोलिसात कार्यरत असलेल्या एका शिपायाने लोहमार्ग पोलिसांच्या कार्यालयीन ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकून स्व:तला एका खोलीत बंद करून घेतले. मेसेजमध्ये डायरी जमादारावर सुटी देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली.

ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसाचे कृत्य : डायरी जमादारावर लाच मागितल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोहमार्ग पोलिसात कार्यरत असलेल्या एका शिपायाने लोहमार्ग पोलिसांच्या कार्यालयीन ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकून स्व:तला एका खोलीत बंद करून घेतले. मेसेजमध्ये डायरी जमादारावर सुटी देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली.जयंत गायकवाड असे लोहमार्ग पोलीस शिपायाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुटी देण्यासाठी गायकवाड याने डायरी जमादार अनिल कुवर यांना विनंती केली. त्या कामासाठी कुवर यांनी मटणाची पार्टी आणि पैसे मागितले. त्यामुळे गायकवाड याला राग आला. त्याने सकाळी ११ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या जवळील आरएमएस इमारतीतील जीआरपीच्या बॅरेकमध्ये दरवाजा बंद करून कोंडून घेतले. त्यापूर्वी त्याने कार्यालयाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज पाठविला. या मॅसेजमध्ये कुवर यांनी लाच मागितल्याचा उल्लेख त्याने केला. त्यानंतर लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली. त्वरित गायकवाड याला बॅरेकच्या बाहेर काढण्यात आले.प्रकरणाचा तपास करू‘जयंत गायकवाड या शिपायाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकून खोलीत कोंडून घेतले होते. त्याला खोलीतून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणाचा अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानंतर दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.’-विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस

टॅग्स :PoliceपोलिसSuicideआत्महत्याrailwayरेल्वे