शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात लॉकडाऊनमधील जप्त वाहनचालकांचे परवाने रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 23:35 IST

लॉकडाऊन आणि पोलिसांनी वारंवार सांगूनही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही. वाहतूक पोलीस वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून आरटीओच्या माध्यमातून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी ७५ वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल : वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन आणि पोलिसांनी वारंवार सांगूनही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांची आता खैर नाही. वाहतूक पोलीस वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून आरटीओच्या माध्यमातून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. वाहतूक पोलिसांनी गुरुवारी पहिल्याच दिवशी ७५ वाहने जप्त करून या सर्वांविरुद्ध भादंवि कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.लॉकडाऊन असूनही लोक रस्त्यावर वाहनांसह फिरताना सर्रास दिसून येत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. सुरुवातीला वाहनचालकांविरुद्ध चालानची कारवाई करण्यात आली. तरीही लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे आता वाहने जप्त करणे सुरू केले आहे. आतापर्यंत ५६९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. वाहने जप्त केल्यानंतरही रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी अशा चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द करण्यास सुरुवात केली आहे.वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या नेतृत्वात गुरुवारी ७५ वाहनचालकांविरुद्ध भादंवि कलम १८८ अंतर्गत लॉकडाऊनचे उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींची वाहने जप्त करण्यात आली आहेत. सर्वाधिक २९ वाहने कामठी चेंबरने जप्त केली आहेत. वाहतूक शाखा येणाºया दिवसात आरटीओकडून आरापींचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची शिफारस करणार आहे.वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रम साळी यांनी सांगितले की, उपद्रवी आणि गैरजबाबदार लोक लॉकडाऊनचे महत्त्व समजून घ्यायला तयार नाहीत. ते स्वत: आणि आपल्या कुटुंबासह सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात घालत आहेत. कोरोनाशी लढाई सोशल डिस्टन्स आणि घरी राहूनच लढली जाऊ शकते. यानंतरही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. पोलिसांना चकमा देऊन पळून जात आहेत. असे लोक पोलिसांना चकमा तर देऊ शकतात परंतु स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवू शकत नाहीत. त्यामुळेच वाहतूक शाखेने अशा लोकांविरुद्ध गुन्हे दाखल ककरून त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पोलीस उपायुक्त साळी यांनी असेही सांगितले की, आरटीओला सांगण्यात येईल की, आरोपी वाहनचालक समाजाप्रति गैरजबाबदार आहेत. त्यांच्या कृत्यामुळे समाजाला धोका निर्माण होतो. त्यामुळे त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करून त्यांना यापासून वंचित ठेवण्यात यावे. याशिवाय दोषी वाहनचालकांविरुद्ध न्यायालयातसुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात येईल. वाहतूक पोलिसांची ही मोहीम लॉकडाऊन असेपर्यंत सुरू राहील. तेव्हा नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही उपायुक्त साळी यांनी केले आहे.वाहन सोडविणे कठीण होईलवाहतूक पोलिसांनी लॉकडाऊनपासून आतापर्यंत ५६९ वाहने जप्त केली आहेत. ही वाहने लॉकडाऊननंतर दंडाची रक्कम भरून सोडवायची होती. गुरुवारी एफआयआर दाखल करणे सुरू झाले आहे. यामुळे वाहने सोडवणे आता कठीण होईल. वाहतूक शाखा आरोपी वाहनचालकांविरुद्ध न्यायालयातही आरोपपत्र दाखल करणार आहे. आरोपी चालकास वाहन सोडवण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागेल. न्यायालयाच्या निर्देशानंतरच वाहतूक शाखा वाहन सोपवेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtraffic policeवाहतूक पोलीस