शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

लॉकडाऊनमुळे लाल मिरचीचे भाव चढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 10:17 IST

यंदाच्या हंगामात लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक बंद राहिल्याने कळमन्यात लाल मिरचीची आवक बंद होती. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या हंगामात लॉकडाऊनमध्ये मालवाहतूक बंद राहिल्याने कळमन्यात लाल मिरचीची आवक बंद होती. त्यामुळे गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत. प्रत्येक राज्यातून आवक आणि दर्जानुसार कळमन्यात भाव १२० ते १५५ तर किरकोळमध्ये १८० ते १९० रुपयांपर्यंत विकली जात आहे. लॉकडाऊनमुळे यंदा लाल मिरचीचे भाव चढेच आहेत.दैनंदिन आहारात तिखटाचे महत्त्व असून स्वयंपाकघरातील महत्त्वपूर्ण भाग आहे. जेवण झणझणीत आणि चविष्ट होण्यासाठी मसाल्यासह तिखटाची गरज असते. महाराष्ट्रात उन्हाळ्यात महिलातर्फे लाल मिरची खरेदी करून वर्षभराचे तिखट तयार करण्याची परंपरा आहे. पण यावर्षी अनेकांनी मिरची खरेदी केलीच नाही. लॉकडाऊनच्या काळात प्लास्टिकबंद तिखट खरेदी करून स्वयंपाकाची गरज भागविली. लॉकडाऊनमुळे सर्व राज्यांच्या सीमा बंद असल्याने प्रारंभीच्या काळात आवक झालीच नाही. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मालवाहतुकीची परवानगी घेऊन आवक सुरू झाली.कळमना बाजाराचे अडतिये आणि व्यापारी संजय वाधवानी म्हणाले, कळमना बाजार आठवड्यात केवळ सोमवारी एक दिवस भरतो. गेल्या सोमवारी बाजारात जवळपास १५ हजार पोत्यांची आवक झाली. प्रत्येक पोते हे ३० ते ४० किलोचे असते. सर्वाधिक आवक आंध्र प्रदेशातून असते. पण यंदा आवक कमीच आहे. येथील शेतकऱ्यांनी मिरची कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आहे. या राज्यात जवळपास ६० लाख पोती कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आहेत. लॉकडाऊन पूर्णपणे हटल्यानंतर आवक वाढेल, त्यानंतरच भाव कमी होतील. पुढील सोमवारी आवकीनंतरच भाव ठरेल.वाधवानी म्हणाले, कळमन्यात चांगल्या प्रतीच्या मिरचीचे भाव १४० ते १५५ रुपयांदरम्यान आहेत. गेल्यावर्षी भाव १२० ते १३५ रुपयांदरम्यान होते. मध्यंतरी गुंटूर मिरचीचे भाव १६० ते १६५ रुपयांवर पोहोचले होते. पण आता कमी झाले आहेत. महाराष्ट्रातील सिरोंचा मिरचीचे भाव १२० ते १३५, राजुरा मिरची १३० ते १५० रुपये भाव आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात विक्री होत आहे. गेल्या काही वर्षांपासून कळमन्यात मिरचीची आवक कमी झाली आहे. ८ ते १० वर्षांपूर्वी आठवड्यात ७० ते ८० हजार पोत्यांची आवक व्हायची, पण आता १५ हजार पोत्यांपर्यंत कमी झाली आहे. व्यापाऱ्यांनी राज्याराज्यातून परस्पर खरेदी सुरू केल्याने कळमन्यातील व्यापार कमी झाला आहे. मिरचीची निर्यात मलेशिया, चीन, श्रीलंका, थायलँड, सौदी अरब आणि अन्य देशात होते.लाल मिरचीचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेशात तर त्या खालोखाल मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात घेतले जाते. आंध्र प्रदेशात मिरचीचे कोल्ड स्टोरेज सर्वात जास्त आहेत. प्रत्येक राज्यात उत्पादन होणाऱ्या लाल मिरचीची चव वेगवेगळी आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मिरचीचा रंग लाल व चमकदार, मध्यम तिखट असते. याशिवाय खम्मम विभागात उत्पादित होणारी तेजा मिरची जगभर प्रसिद्ध आहे. ही मिरची जास्त तिखट असलेली ओळखली जाते. तिखट खाणाऱ्या लोकांची या मिरचीला मागणी असते. कर्नाटकातील बेडगी भागात उत्पादन होणारी मिरचीचा रंग भडक, सौम्य तिखट असते. त्यामुळे या मिरचीला तारांकित हॉटेलमध्ये चांगली मागणी असते.

 

टॅग्स :vegetableभाज्याbusinessव्यवसाय