शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वनदेवीनगरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान तणाव; पोलीसांच्या मदतीने विभागाने २७ घरांचे अतिक्रमण काढले

By मंगेश व्यवहारे | Updated: February 21, 2023 19:38 IST

उत्तर नागपुरातील वनदेवीनगरातील नाल्याच्या काठावरील फुटपाथवर अवैध पद्धतीने बांधण्यात आलेले घरावर अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या प्रवर्तन विभागाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला. 

नागपूर : उत्तर नागपुरातील आसीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या वनदेवीनगरातील नाल्याच्या काठावरील फुटपाथवर अवैध पद्धतीने बांधण्यात आलेले घरावर अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या प्रवर्तन विभागाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला. ही कारवाई थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं एकत्र आली होती. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलीसांच्या बंदोबस्तात पथकाने २७ घरांचे अतिक्रमण काढले.

आशीनगर झोन अंतर्गत ईटाभट्टी चौक येथील वनदेवीनगर नाल्या काठावर अवैध पद्धतीने घरे बांधण्यात आले होते. अतिक्रमणाच्या संदर्भात उच्च न्यायालयाने मनपा प्रशासनाला सुनावल्यानंतर महापालिकेचा अतिक्रमण विभागाने शहरातील अतिक्रमण झालेले रस्ते व फुटपाथ मोकळे करण्यासाठी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या अंतर्गत मंगळवारी अतिक्रमणाचे पथक जेसीबी घेऊन वनदेवीनगरात कारवाईसाठी गेले असता, शेकडोच्या संख्येने लोकं एकत्र झाले. त्यांनी कारवाईला प्रचंड विरोध केला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर अतिक्रमण विभागाने पोलीसांना सूचना केली. यशोधरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण आपली कुमक घेऊन घटनास्थळी पोहचले. पोलीसांचा प्रचंड ताफ्यात अतिक्रमण विभागाने नाल्याच्या काठावरील २७ घरांचे अतिक्रमण काढले.

 राजविलास थिएटर समोरील दुकानांवर कारवाईगांधीबाग झोन अंतर्गत राजविलास थिएटर समोरील समोरील दुकानांवरही अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये दुकानाचे ग्रील व शेटर काढण्यात आले. त्या नंतर अवैध पद्धतीने बांधलेले पुस्तकाचे ३ दुकान व चहा/नाश्ता चे २ दुकान तोडण्यात आले.

महाराजबाग परिसरातील टेडीबियर वाल्यांचे अतिक्रमण काढलेधरमपेठ झोन अंतर्गत महाराजबाग परिसरातील टेडी बियर वाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर झाशीराणी चौक ते मुंजे चौक ते व्हेरायटी चौक ते परत महाराजबाग रोड लता मंगेशकर दवाखाना समोरील परिसरपर्यंत अतिक्रमणची कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड व फूटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. परिसरातील अंदाजे ४२ अतिक्रमण हटविले, तसेच परिसर मोकळा करण्यात आला. ही कारवाई उपायुक्त अशोक पाटील, सहा. आयुक्त हरीष राऊत, प्रवर्तन अधीक्षक संजय कांबळे, सुनील सरपाटे, भास्कर माळवे, विनोद कोकार्डे, विनोद डोंगरे, बाबाराव श्रीखंडे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली.

 

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका