शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था १ जुलैची मतदार यादी ग्राह्य धरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:10 IST

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे : नागपूर विभागातील पूर्वतयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल, त्यादृष्टीने निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बुधवारी येथे दिल्या. दरम्यान मध्यप्रदेश राज्य निवडणूक आयोगासोबत करार करण्यात आला असून, त्यानुसार मतदान यंत्र उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा परिषद, ५५ नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तसेच नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या पूर्वतयारीचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, तसेच नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, नागपूर व चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी तसेच निवडणुकी संदर्भातील सर्व यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार मतदार संख्येमध्ये झालेल्या वाढीनुसार मतदान केंद्रामध्ये वाढ करण्यात यावी, तसेच मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा निर्माण करताना, दिव्यांग मतदारांना मतदान करताना अडचण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, तसेच आदर्श मतदान केंद्र, पिंक मतदार केंद्र तयार करावे. मतदारांना मतदान करताना अडचण होणार नाही, यादृष्टीनेही आवश्यक तयारी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. मतदान यादीचे मतदान केंद्रनिहाय विभाजन करताना १ जुलै २०२५ ची यादी ग्राह्य धरण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

मध्य प्रदेशातून ७५ हजार तर ईसीआयकडून १ लक्ष बॅलेट युनिटची मागणीमध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगासोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार ७५ हजार बॅलेट युनीट आणि २५ हजार कंट्रोल युनिट भेटणार आहेत. तसेच, ईसीआयकडून (केंद्रीय निवडणूक आयोग) ५० हजार कंट्रोल युनिट व १ लक्ष बॅलेट युनिटची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राची वाहतूक करावी. तसेच, मतदान यंत्र ठेवण्यासाठी आवश्यक शासकीय गोदामाची व्यवस्था करावी, प्रत्यक्ष मतदानापूर्वी मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करावी, तसेच प्रशिक्षण आयोजित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात. दरम्यान विभागीय आयुक्त बिदरी यांनी विभागाच्या तयारीचे सादरीकरण केले.

अशी आहे आवश्यकताविभागातील गोंदिया व भंडारा वगळून ४ जिल्हा परिषदेसाठी १ जुलै २०२५ च्या मतदार यादीनुसार ४० लाख २३ हजार ०२९ मतदार असून, मतदानासाठी ६ हजार ४४१ मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहे. या मतदानासाठी ७,२८० कंट्रोल युनिट व १६,२८८ बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५५ नगर परिषद व नगर पंचायतीमध्ये १८ लाख १२ हजार १६७ मतदारांची संख्या आहे. यासाठी २,३७८ मतदान केंद्र राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे निवडणूक पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ च्या यादीनुसार २४ लाख ८४ हजार २५० मतदार संख्या असून, यासाठी ३,१५० मतदान केंद्र प्रस्तावित आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024nagpurनागपूरZP Electionजिल्हा परिषद