शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

नागपूर मनपाच्या तिजोरीकरिता ‘लॉबिंग’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 9:36 PM

मनपाच्या तिजोरीकरिता आता लॉबिंग सुरू झाली असून २० फेब्रुवारीला होणाऱ्या आमसभेत स्थायी समिती अध्यक्षपदाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देस्थायी समिती अध्यक्षांच्या नावाचा खुलासा २० ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपाच्या तिजोरीकरिता आता लॉबिंग सुरू झाली असून २० फेब्रुवारीला होणाऱ्या आमसभेत स्थायी समिती अध्यक्षपदाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. दोन्ही ठिकाणी यावर्षी निवडणुका होणार आहे. निवडणुकांमध्ये शहरात होणाऱ्या विकास कामांच्या आधारे मतदारांना आकर्षित करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत मनपाच्या कामाचा परिणाम दिसणार आहे.स्थायी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांना आर्थिक संकटाच्या काळात मनपाची तिजोरी मिळाली. त्यांनी राज्य सरकारकडून १५० कोटी रुपयांचे विशेष अनुदान मनपाकडे खेचून आणले. शिवाय जीएसटी अनुदान ५२ कोटींवरून ८७ कोटींवर नेले. त्यामुळे आर्थिक अडचण थोडी दूर झाली. अशा स्थितीत स्थायी समितीचा नवा प्रमुख सक्षम असावा, याकरिता शहर भाजपा प्रयत्नरत आहे. पण निवडणूक क्षेत्राच्या आधारावर अध्यक्षपदावर पूर्व नागपूरचा सर्वाधिक दावा आहे. या क्षेत्रात भाजपाची मोठी व्होट बँक आहे. अशा स्थितीत त्यांचा दावा जास्त आहे.नवीन सरकारमध्ये पश्चिम नागपुरातून संदीप जाधव, उत्तर नागपुरातून विद्यमान अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा आहेत. दक्षिण-पश्चिम नागपुरातून महापौर नंदा जिचकार व सत्तापक्ष नेता संदीप जोशी आहेत. उपमहापौर दीपराज पार्डीकर मध्य नागपुरातून आहेत. अशावेळी पूर्व व दक्षिण नागपूरचा स्थायी समितीच्या अध्यक्षादावर मोठा दावा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक ठेवणारे आणि एका विशेष समितीची दुसऱ्यांदा सभापतिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका भाजपा नगरसेवकाने तिजोरीची चावी मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पण त्यांच्या नावाचा विरोध पक्षातील पदाधिकारी करीत आहेत.स्थायी समिती अध्यक्षपदावर महिला सदस्यांना भाजपा संधी देत नाही. महापौर पदासाठी उपनेते वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे यांचा नावाचा विचार झाला, पण त्यांना संधी मिळाली नाही. पण आता लोकसंख्येच्या आधारावर नागपूरकरांना आकर्षित करण्यासाठी महिला सदस्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पूर्व नागपूरचा सर्वाधिक दावा आहे. इच्छुकांनी स्वत:च्या निवडणूक क्षेत्रातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडे लॉबिंग सुरू केले आहे. भाजपासाठी स्थायी समिती अध्यक्षाची निवडणूक हे कठीण काम आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीनंतर अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.उल्लेखनीय असे की, एप्रिलमध्ये लोकसभा आणि आॅक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षांना दोनदा आचारसंहितेची अडचण येणार आहे. भाजपाच्या अनेक सदस्यांचा या पदासाठी विचार करण्यात आलेला नाही. त्यांनी निवडणुकीत नाराजी व्यक्त केली तर पक्षाला नुकसान होणार आहे.२० फेब्रुवारीला होणाऱ्या आमसभेत भाजपाचे सदस्य नागेश मानकर, कल्पना कुंभलकर, विद्या कन्हेरे, अभिरुची राजगिरे, काँग्रेसचे जुल्फेकार अहमद भुट्टो, मनोज सांगोळे आणि बसपाच्या मंगला लांजेवार १ मार्च २०१९ ला सेवानिवृत्त होत आहेत. भाजपाप्रमाणेच काँग्रेसच्या दोन सदस्यांची निवड विपक्ष नेते तानाजी वनवे यांच्यासमोर डोकेदुखी ठरणार आहे. काँग्रेसच्या हर्षला साबळे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत काँग्रेसच्या दोन सदस्यांनाच संधी मिळू शकते. सभेत नवीन सदस्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यासोबतच अध्यक्षाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूक